आज पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता खात्यात जमा होणार का? जाणून घ्या महत्वाची माहिती

On: July 18, 2025 10:41 AM
PM Kisan 20th Installment
---Advertisement---

PM Kisan 20th Installment | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची प्रतिक्षा देशभरातील कोट्यवधी शेतकरी बांधव करत आहेत. जुलै महिना अर्ध्यावर आला असूनही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संभ्रम आणि चिंतेचं वातावरण पसरलं आहे. (PM Kisan 20th Installment)

दरवेळी प्रमाणे यावेळी देखील २००० रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. मात्र यंदा केंद्र सरकारकडून अद्याप कोणताही अधिकृत कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे आता सर्वांचं लक्ष १८ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहारमधील मोतिहारी येथील जाहीर कार्यक्रमाकडे लागलं आहे.

१८ जुलैच्या कार्यक्रमात होणार का मोठी घोषणा? :

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१८ जुलै) मोतिहारी येथे विविध योजनांचा शुभारंभ करत आहेत. यामध्ये रस्ते, रेल्वे, आयटी, आणि प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत ४०,००० लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदतीचा समावेश आहे. त्यामुळेच या कार्यक्रमातच पीएम किसान योजनेच्या २० व्या हप्त्याची घोषणा होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (PM Kisan 20th Installment)

असे झाल्यास लवकरच २००० रुपयांची रक्कम थेट खात्यावर जमा होऊ शकते. मात्र पंतप्रधान कार्यालय किंवा कृषी मंत्रालयाकडून अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे ‘वेट अँड वॉच’ची भूमिका शेतकरी बांधवांनी घेण्याशिवाय पर्याय उरत नाही.

PM Kisan 20th Installment | हप्त्याचा उशीर का? :

सामान्यतः पीएम किसान हप्त्याची अधिकृत घोषणा एक दिवस आधी केली जाते आणि त्यानंतरच रक्कम खात्यात जमा केली जाते. मात्र, यंदा १७ जुलैपर्यंत देखील कोणताही संकेत मिळालेला नाही. मागील हप्ते जून व फेब्रुवारीमध्ये दिले गेले होते. यंदा जुलैमध्ये उशीर होत असल्याने सरकारकडून स्पष्टीकरण अपेक्षित आहे.

दरम्यान, सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की, ई-केवायसी, शेतकरी आयडी, जमिनीचे दस्तऐवज यांची पडताळणी पूर्ण नसेल, तर हप्ता रोखला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने पुढील प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे:

ई-केवायसी अपडेट – pmkisan.gov.in वर ऑनलाइन किंवा CSC केंद्रावर जाऊन.

शेतकरी आयडी तयार करणे – शेती नोंदणी संबंधित माहिती अद्ययावत ठेवा.

बँक खाती आणि आधार लिंक आहेत का? – खात्री करून घ्या.

मोबाईल नंबर अचूक आहे का? – अपडेट्स मिळण्यासाठी आवश्यक आहे.

News Title: PM Kisan 20th Installment Today? Know Latest Update on ₹2000 Credit in Farmers’ Account

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now