PM किसानचा पुढचा हप्ता येणार, पण त्याआधी ‘हे’ काम करा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत!

On: June 17, 2025 5:57 PM
PM Kisan 21st Installment
---Advertisement---

PM Kisan 20th installment | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, २० जून २०२५ रोजी हा हप्ता देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर होणार आहे. यावेळी सुमारे ९.५ कोटी लाभार्थ्यांना एकूण २० हजार कोटी रुपयांचे वाटप होणार आहे.

हप्त्याची तारीख निश्चित; ३ दिवसांत खात्यात जमा :

फेब्रुवारी २०२५ मध्ये १९ वा हप्ता जमा करण्यात आला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली. केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले की, जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात, म्हणजेच २० जून रोजी (शुक्रवार) लाभार्थ्यांच्या खात्यात २,००० रुपयांचा हप्ता जमा केला जाईल.

त्यानुसार, देशभरात एकाच दिवशी ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकत्रितपणे २०,००० कोटी रुपये पाठवले जातील, हे आर्थिकदृष्ट्या एक मोठे पाऊल मानले जात आहे. (PM Kisan 20th installment)

हप्ता अडण्याचे कारण? ई-व्हेरिफिकेशन आणि बँक तपशील महत्त्वाचे :

जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि याआधी हप्ते मिळवले असतील, तरीही यावेळी तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यासाठी काही अटी पूर्ण करणे गरजेचे आहे.

ई-केवायसी (E-KYC) आणि बँक तपशील अपडेट नसेल, तर तुमचा हप्ता थांबू शकतो. त्यामुळे २० तारखेच्या आधी ई-व्हेरिफिकेशन करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. (PM Kisan 20th installment)

तसेच, लाभार्थ्यांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तपासावे.

News Title: PM Kisan 20th Installment on June 20: Farmers Must Complete eKYC to Avoid Payment Issues

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now