PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. सरकारच्या अधिकृत सूत्रांनुसार, काही तांत्रिक अडचणींमुळे हा हप्ता उशिरा येत असला, तरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तो वितरित होण्याची शक्यता आहे.
२०वा हप्ता कधी जमा होणार? :
PM-KISAN योजनेनुसार, दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांत प्रत्येकी ₹2,000 अशी एकूण ₹6,000 ची थेट आर्थिक मदत दिली जाते. योजनेचे आतापर्यंत 19 हप्ते वितरित करण्यात आले असून, 20व्या हप्त्यासाठी शेतकरी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. (PM Kisan Yojana)
या हप्त्याचा वितरण कालावधी जून 2025 मध्ये अपेक्षित होता, मात्र प्रशासनिक कारणांमुळे तो लांबला. आता ऑगस्ट 2025 च्या पहिल्या आठवड्यात पैसे खात्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
PM Kisan Yojana | DBT प्रणालीमुळे थेट लाभ :
PM-KISAN योजनेतून मिळणारे पैसे DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. त्यामुळे कोणताही मध्यस्थ नाही, भ्रष्टाचार नाही, आणि लाभार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळते.
शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? :
– या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आले आहे.
– ज्यांनी अजून e-KYC पूर्ण केलेले नाही, त्यांनी ते pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्वरित पूर्ण करावे. (PM Kisan Yojana)
– आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती व नाव अचूक आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.
– अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी लॉगिन करून स्टेटस तपासावे.






