PM Kisan 20th Installment | देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही आर्थिक मदतीची महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये एकूण 6 हजार रुपये दिले जातात. योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जारी करण्यात आला होता. आता संपूर्ण देशातील कोट्यवधी शेतकरी 20 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. (PM Kisan 20th Installment)
मिळालेल्या माहितीनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो. मात्र, सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही मागील हप्त्यांचा ट्रेंड पाहता, पुढील हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
…तर हप्ता मिळणार नाही
अनेक शेतकऱ्यांना अजूनही असे वाटते की योजना सुरू असून आपोआप पैसे खात्यावर जमा होतील. मात्र, आता केंद्र सरकारने दोन महत्त्वाच्या प्रक्रिया अनिवार्य केल्या आहेत — ई-केवायसी (e-KYC) आणि जमीन पडताळणी. या दोन्ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास, हप्ता मिळणार नाही.
19 व्या हप्त्यातही हे दिसून आले की ज्यांनी ई-केवायसी किंवा जमीन पडताळणी केली नव्हती, त्यांना हप्ता मिळाला नाही. सरकारचा उद्देश आहे की फक्त खरोखर गरजूंनाच या योजनेचा लाभ मिळावा. त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याने आपली कागदपत्रे आणि माहिती वेळेत अद्ययावत करावी.
आता वेळेवर ‘ही’ कृती करा
जून 2025 मध्ये येणारा हप्ता मिळवण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी लगेचच ई-केवायसी पूर्ण करावी आणि जमिनीची पडताळणीसुद्धा पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपण PM Kisan च्या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन करू शकता. (PM Kisan 20th Installment)
कोणताही गोंधळ टाळण्यासाठी आणि 20 वा हप्ता वेळेत मिळावा यासाठी ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नियम पाळणे गरजेचे आहे, अन्यथा आपोआप पैसे येणार, हे गृहीत धरू नये.
Title: PM Kisan 20th Installment June 2025 Complete eKYC and Land Verification






