PM Awas Yojana | पुणे म्हाडा मंडळाने PM Awas Yojana अंतर्गत घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या योजनेत अल्पदरात घरे उपलब्ध होत असून पात्र लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदानही मिळणार आहे. पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. चला तर पाहूयात किती अनुदान मिळेल आणि अटी-शर्ती काय आहेत. (PM Awas Yojana Rules)
किती अनुदान मिळणार? :
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केंद्र आणि राज्य शासन मिळून एकूण ₹2,50,000/- प्रति सदनिका अनुदान दिले जाणार आहे.
याशिवाय, महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) विशेष सवलत दिली आहे. पात्र लाभार्थ्यांना फक्त ₹1,000/- स्टँप ड्युटी भरावी लागेल. (Pune Affordable Housing)
PM Awas Yojana | अर्जदारासाठी अटी :
– अर्जदार व त्याच्या कुटुंबाच्या (पती-पत्नी व अविवाहित मुले) नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे.
– अर्ज करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेत नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी झाल्यास अर्ज क्रमांक अर्जात नमूद करणे बंधनकारक आहे.
– अर्जदाराचे आणि पती-पत्नीचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹3,00,000/- पेक्षा जास्त नसावे.
– सदनिका अर्ज कुटुंबातील कर्त्या महिलेच्या नावाने किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावाने करणे आवश्यक.
– अर्जदार व पती/पत्नी दोघेही सोडतीत यशस्वी झाल्यास, फक्त एकच सदनिका मिळण्यास पात्रता राहील.
– सदनिकांची पुनर्विक्री ताबा मिळाल्यानंतर 10 वर्षे करता येणार नाही.
भरणा व हप्ते नियम :
– सदनिकांची विक्री किंमत बांधकाम प्रगतीनुसार ठरलेल्या हप्त्यांमध्ये भरावी लागेल.
– योजना अग्रीम अंशदान तत्वावर राबविली जात आहे. (PM Awas Yojana Rules)
– अर्जदाराने अनामत रकमेचा परतावा मागितल्यास अर्ज रकमेपैकी 25% रक्कम कपात केली जाईल.
– तात्पुरते देकार पत्र (Provisional Offer Letter) मिळाल्यानंतर सदनिका नाकारल्यास, अर्जदाराकडून भरलेल्या रकमेपैकी 11% रक्कम कपात करून उर्वरीत रक्कम परत केली जाईल.
– तसेच जर समपहरणानंतर अर्जदाराला परतावा लागू झाला नाही, तर अनामत रक्कमेचा परतावा दिला जाणार नाही.






