आता मनमानी चालणार नाही, BCCI च्या 10 नियमांमुळे खेळाडूंना जोर का झटका

On: January 17, 2025 12:27 PM
BCCI
---Advertisement---

BCCI l भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी राष्ट्रीय संघात शिस्त आणि एकजूटता कायम राहावी, यासाठी १० कलमी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार, खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट (Domestic Cricket) खेळणे बंधनकारक (Mandatory) करण्यात आले आहे. तसेच, दौऱ्यादरम्यान खेळाडूंच्या कुटुंबीयांच्या आणि वैयक्तिक स्टाफच्या (Personal Staff) उपस्थितीवर बंधने घालण्यात आली आहेत. वैयक्तिक जाहिरातींवरही बंदी घालण्यात आली आहे.

या नियमांचे पालन न करणाऱ्या खेळाडूंवर कडक कारवाई (Strict Action) करण्यात येणार आहे. त्यांच्या मानधनात (Salary) कपात आणि आयपीएल (IPL) सहभागापासून दूर ठेवणे, अशा कारवाईचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने ही नियमावली घोषित केली आहे.

बीसीसीआयने जाहीर केलेले १० निर्बंध खालीलप्रमाणे:

– राष्ट्रीय संघातील प्रत्येक खेळाडूला देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य असेल.
– विदेशी दौऱ्यांमध्ये खेळाडूंसोबत कुटुंबीय सदस्य केवळ दोन आठवडे राहू शकतील.
– विदेशी दौऱ्यांमध्ये वैयक्तिक स्टाफ आणि व्यावसायिक फोटोशूटवर (Photoshoot) बंदी.
– दौरा सुरू असताना कोणत्याही खेळाडूला स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी नसेल.
– दौरा किंवा सामना लवकर संपल्यानंतर खेळाडूंना लवकर परतण्याची मुभा मिळणार नाही.
– अपवादात्मक सूट मिळवण्यासाठी निवड समिती अध्यक्ष आणि मुख्य प्रशिक्षकांद्वारे (Head Coach) पूर्वसूचना द्यावी लागेल.
– या नियमावलीचे पालन न करणाऱ्यांवर बीसीसीआयद्वारे योग्य कारवाई करण्यात येईल.
– कोणत्याही खेळाडूविरुद्ध शिस्तभंगाची (Indiscipline) कारवाई करण्याचे सर्व हक्क बीसीसीआयकडे असतील.
– या हक्कांनुसार संबंधित खेळाडूला आयपीएलसह बीसीसीआयच्या सर्व स्पर्धांपासून (Tournaments) दूर ठेवण्यात येईल.
– दोषी खेळाडूच्या केंद्रीय करारानुसार (Central Contract) मिळणाऱ्या सामना शुल्कात (Match Fees) कपात करण्यात येईल.

News Title: Play Domestic Cricket or Face Action: BCCI’s Strict 10-Point Guidelines for Indian Cricketers

महत्वाच्या बातम्या-

सिंगल की मिंगल?, कार्तिक आर्यनचा रिलेशनशिपबाबत मोठा खुलासा

नवऱ्याला बिअर पाजली नंतर बॉयफ्रेंडला बोलवलं, पत्नीच्या कृत्यानं पोलिसही हादरले

एसटी महामंडळाकडून अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश, आता अतिमोबाईल वापराल तर…

‘चार मुले जन्माला घाला’; ‘या’ बड्या नेत्याचं ब्राह्मण समाजाला आवाहन

शेतात अर्धांगवायूचा झटका, मालकाने हाक देताच बैल सर्जा मतदीला धावला

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now