टेक ऑफनंतर विमान कसं कोसळलं?, अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर

On: June 12, 2025 2:51 PM
Air India Crash
---Advertisement---

Ahmedabad Plane Crash | गुजरातच्या अहमदाबादमध्ये आज एक भीषण विमान दुर्घटना (Ahmedabad Plane Crash) घडली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात, एका रहिवासी वस्तीतच एक प्रवासी विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हे विमान ‘एअर इंडिया’चे असल्याचे समजते. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या असून, बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

या विमानात किती प्रवासी होते, याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे देखील प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे या घटनेचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

विमान अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. तांत्रिक बिघाड की अन्य काही कारण, याचा तपास सुरू आहे. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आणि बचावकार्य अधिक वेगाने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गुजरातमधील अहमदाबाद येथे घडलेल्या या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात मेघानीनगर या नागरी वस्तीतच झाल्याने मोठ्या चिंतेचे वातावरण आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानातून तब्बल १३३ प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. विमान जिथे क्रॅश झाले, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे आकाशात धुराचे साम्राज्य पसरले आहे.

घटनास्थळी बचाव पथके पोहोचले असून, जखमींना मदत करण्याचे आणि मृतांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही दुर्घटना नागरी वस्तीत घडल्याने आणि विमान कोसळल्यानंतर धुराचे लोळ व आगीची शक्यता असल्याने, यात मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातामुळे विमान प्रवासाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

News Title- Plane Crashes in Gujarat, Major Casualties Feared

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now