Pitru Paksha 2024 l सध्या पितृपक्ष पंधरवडा आहे. या पितृ पक्षाच्या काळात 2 ऑक्टोबरपर्यंत तर्पण, पिंडदान आणि दान अर्पण करून पितरांना तृप्त केले जाते. श्राद्ध पक्ष म्हणजे पितरांचे ऋण फेडण्याची वेळ. या काळात पितरांच्या मृत्यूच्या तिथीला श्राद्ध केल्यास वर्षभर सुख-समृद्धी राहते असे मानले जाते.
श्राद्धाचे भोजन फक्त कावळ्यांनाच का दिले जाते :
शास्त्रात श्राद्धात कावळ्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. पितरांसाठी तयार केलेल्या अन्नातून पंचबली भोग (कावळे, गाय, कुत्री, मुंग्या आणि देवांना अर्पण करणे) महत्वाचे आहे. परंतु श्राद्धाचे भोजन फक्त कावळ्यांनाच का दिले जाते, यामागचे रहस्य काय आहे? तर जाणून घेऊयात…
गरुड पुराणानुसार कावळा हे यमराजाचे प्रतीक मानले जाते. श्राद्धाच्या वेळी कावळ्याने अन्न खाल्ल्यास पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. यामुळे यमराज प्रसन्न होतात आणि पितरांचे आत्मे तृप्त होतात.
Pitru Paksha 2024 l श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे महत्त्वाचे :
गरुड पुराणात सांगितले आहे की, यमराजांनी कावळ्याला वरदान दिले होते की, कावळ्यांना दिलेले अन्न पितरांच्या आत्म्याला शांती देईल. त्यांना अन्न पुरवेल, यामुळे त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांना मोक्ष मिळण्यास मदत होईल.
शास्त्रात असेही सांगितले आहे की श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच ब्राम्हणांना दिले जाते. पितृपक्षात घराच्या अंगणात कावळा येऊन बसला तर ते शुभ लक्षण मानले जाते. तुम्ही दिलेले अन्न जर कावळा खात असेल तर ते खूप शुभ आहे. हे सूचित करते की तुमचे पूर्वज तुमच्यावर खूप आनंदी आहेत.
News Title : Pitru Paksha 2024
महत्त्वाच्या बातम्या-
तिरुपती बालाजीचा लाडू वादाच्या भोवऱ्यात; ही भेसळ म्हणजे…
बिग बॉस मराठी 5 बंद होणार? ‘या’ तारखेला होणार ग्रँड फिनाले
‘या’ बातमीत दडलाय वजन कमी करण्याचा रामबाण उपाय; डाएट, जीम न लावता व्हाल स्लिम
टीम इंडियाच्या प्रिन्सने बांगलादेशला धु धु धुतलं… ‘या’ दिग्ग्ज खेळाडूंना टाकलं मागे
निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना जोर का झटका; ‘हा’ बडा नेता फुंकणार तुतारी?






