नकुल भोईर खून प्रकरणाला धक्कादायक वळण; बॉयफ्रेंडसोबत मिळून बायकोने केला नवऱ्याचा गेम

On: October 30, 2025 1:49 PM
nakul bhoir
---Advertisement---

Nakul Bhoir Murder | पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल भोईर यांच्या हत्येने गेल्या आठवड्यात शहर हादरले. ऐन दिवाळीत (Diwali) पत्नी चैतालीनेच (Chaitali) खून केल्याचे समोर आले होते. मात्र, आता या गुन्ह्यात ती एकटी नसून, तिच्या प्रियकराचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे, ज्यामुळे प्रकरणाला धक्कादायक वळण लागले आहे.

अनैतिक संबंध आणि हत्येचा कट :

नकुल भोईर (Nakul Bhoir) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चैतालीचा प्रियकर सिद्धार्थ पवार (Siddharth Pawar) यालाही अटक केली आहे. चैतालीचे सिद्धार्थसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब पती नकुल याला समजली होती. नकुलने तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने भेटणे सुरूच ठेवले. याच मुद्यावरून त्यांच्यात वारंवार टोकाचे वाद होत होते.

हत्येच्या दिवशी, दुपारपासूनच चैताली आणि नकुल यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद आणि मारहाण सुरू होती. रात्री हा वाद विकोपाला गेला. यावेळी नकुल मद्यधुंद अवस्थेत होता. चैतालीने एका कापडाने (ओढणी) त्याचा गळा आवळण्यास सुरुवात केली. नकुलने प्रतिकार करताच, तिथे उपस्थित असलेल्या सिद्धार्थनेही चैतालीला मदत केली. त्याने कापडाचे दुसरे टोक ओढले आणि दोघांनी मिळून नकुलचा निर्घृणपणे जीव घेतला.

Nakul Bhoir Murder | असा झाला बिंग फुट आणि अटकेची कारवाई :

नकुलचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच, चैतालीने सिद्धार्थला (Siddharth Pawar) तेथून निघून जाण्यास सांगितले. तिने हत्येचा सर्व आरोप स्वतःवर घेण्याची योजना आखली आणि स्वतःच पोलिसांना फोन करून बोलावले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चैतालीला (Chaitali) ताब्यात घेतले. मात्र, घटनास्थळी तीन लोकांनी मद्यपान केल्याचे पुरावे पोलिसांना सापडले, त्यामुळे चैतालीच्या जबाबावर संशय बळावला.

पोलिसांनी खाक्या दाखवताच चैतालीने सिद्धार्थचे नाव उघड केले. पोलिसांनी सिद्धार्थला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्या जबाबात आणि घटनास्थळाच्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमध्ये तफावत आढळली. विशेषतः, त्याच्या येण्या-जाण्याच्या वेळेत विसंगती होती. पोलिसी खाक्या दाखवताच अखेर सिद्धार्थ पवारने (Siddharth Pawar) गुन्हा कबूल केला. नकुल भोईर यांच्या हत्येप्रकरणी दोन्ही आरोपींना १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक गोसावी (Deepak Gosavi) यांनी दिली.

News title : Pimpri Murder Twist: Wife Killed Husband With Lover

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now