Pimpri-Chinchwad News | पिंपरी-चिंचवडमधील विशेषतः आकुर्डी चिंचवड (Akurdi Chinchwad), तुकारामनगर (Tukaramnagar), थेरगाव (Thergaon), निगडी (Nigdi) नेहरूनगर(Nehrunagar), पिंपळे गुरव( Pimple Gurav), पिंपळे निलख(Pimple Nilakh), आकुर्डी परिसर(Akurdi Area), चिंचवड परिसर(Chinchwad Area), भोसरी, चिखली परिसर नागरिकांनो काळजी घ्या. सध्या जीबी सिंड्रोमचा (Guillain-Barre Syndrome) फैलाव चिंतेचा विषय बनला आहे. (Pimpri-Chinchwad News)
राज्यात (State) या दुर्मिळ आजाराचे एकूण ६७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण पुणे (Pune) शहरातील असून, पिंपरी-चिंचवडमध्येही (Pimpri-Chinchwad) १२ रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विभागाने (Medical Department) सतर्कतेचा इशारा (Alert) दिला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनांना (Preventive Measures) सुरुवात केली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) परिस्थिती
पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आतापर्यंत ‘जीबीएस’चे (GBS) १२ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना अचानक सुन्नपणा येणे, हातापायांना मुंग्या येणे, स्नायू कमकुवत होणे अशी लक्षणे आढळत आहेत. महापालिकेच्या (Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने (Medical Department) या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक (Meeting) घेत, आजाराचा प्रसार, संसर्गाचा स्रोत, रुग्णांची आणि नमुन्यांची (Samples) तपासणी याबाबत चर्चा केली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Medical Department) कार्यवाही सुरू केली आहे. रुग्ण आढळलेल्या परिसरामध्ये पथक (Squad) नेमण्यात आले असून, सर्वेक्षणही (Survey) सुरू झाले आहे.
पुण्यातील (Pune) रुग्णसंख्या चिंताजनक
पुणे (Pune) शहरात ‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’च्या (Guillain-Barre Syndrome) रुग्णांची संख्या ५९ वरून वाढून ६७ झाली आहे. यापैकी सर्वाधिक रुग्णसंख्या ही ग्रामीण भागातील आहे. पुणे मनपा (Pune Municipal Corporation) व जिल्हा आरोग्य विभागाने (District Health Department) संयुक्तपणे सर्वेक्षण (Survey) सुरु केले आहे. रुग्णांचे नमुने (Samples) ‘एनआयव्ही’कडे (NIV) तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, परंतु अद्याप अहवाल (Report) प्राप्त झालेले नाहीत. आत्तापर्यंत एकूण ६७ रुग्ण आढळले असून, त्यापैकी ३९ रुग्ण पुणे ग्रामीण (Pune Rural), १३ रुग्ण पुणे मनपा (Pune Municipal Corporation), १२ रुग्ण पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) आणि ३ रुग्ण इतर जिल्ह्यांतील (Districts) आहेत. या ६७ रुग्णांपैकी ४३ पुरुष आणि २४ महिलांचा समावेश आहे, तर १३ रुग्ण व्हेंटिलेटरवर (Ventilator) आहेत. (Pimpri-Chinchwad News)
आजाराची सर्वसाधारण लक्षणे (Common Symptoms):
अचानक पायातील किंवा हातातील त्राण जाणे.
अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा.
अनेक दिवसांपासूनचा जुलाबाचा (Diarrhea) त्रास.
काळजी घेण्याचे आवाहन
पाणी उकळून (Boiled) गार केलेले प्या.
बाहेर जाताना घरचेच पाणी सोबत बाळगा.
फळे, पालेभाज्या नीट धुवूनच वापरा.
बाहेरचे खाणे टाळा.
घरच्या घरी ताजे अन्न शिजवून खा.
वैयक्तिक स्वच्छता राखा. (Pimpri-Chinchwad News)
तज्ज्ञांचे (Experts) मत
“‘कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी’ (Campylobacter jejuni) या जिवाणूच्या (Bacteria) संसर्गामुळे (Infection) ‘जीबीएस’ (GBS) आजार होण्याची शक्यता आहे. हा संसर्ग दूषित अन्न (Contaminated Food) किंवा पाणी (Contaminated Water) पिल्याने होऊ शकतो. या आजारावर उपचार उपलब्ध असून, नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी,” असे मत वरिष्ठ साथरोग तज्ज्ञ (Senior Epidemiologist) डॉ. प्रदीप आवटे (Dr. Pradip Awate) यांनी व्यक्त केले आहे.
Title : Pimpri-Chinchwad News GBS Cases on the Rise 67 Cases Reported 12 on Ventilator






