Pimpri Chinchwad Crime| पुणे जिल्ह्यातील चिंचवड येथे पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चारित्र्यावर सतत संशय घेऊन मानसिक त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीनेच गळा आवळून खून केला आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली, त्यावेळी त्यांची दोन लहान मुले बेडरूममध्ये झोपलेली होती. नकुल आनंद भोईर असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून, चैताली भोईर असं हत्या करणाऱ्या पत्नीचं नाव आहे.
शुक्रवारी पहाटेच्या सुमारात तीन वाजता या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला आणि हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात पत्नीने पतीचा कापडाने गळा आवळून खून केला. या प्रकरणात हत्या झालेल्या ४० वर्षीय व्यक्तीचे नाव नकुल भोईर असून, खून करणारी त्याची २८ वर्षीय पत्नी चैताली नकुल भोईर हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pimpri Chinchwad Crime)
Pimpri Chinchwad Crime : काय आहे नेमके प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुल भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर नेहमीच संशय घेत असे, ज्यामुळे दोघांमध्ये वारंवार मोठे वाद होत होते. चैताली या सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांची नगरसेविका होण्याची महत्त्वाकांक्षा होती. पती-पत्नी दोघेही साडी सेंटर चालवत होते. मात्र, नकुलच्या संशयी स्वभावामुळे चैताली कमालीच्या त्रस्त होत्या.
आज पहाटे सुमारे साडेतीन वाजता दोघांमध्ये पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. याच वादातून संतापलेल्या चैतालीने घरातील एका कपड्याने पती नकुलचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली. (Pimpri Chinchwad Crime) ही संपूर्ण घटना बाहेरच्या खोलीत घडली, तर त्यांची दोन आणि पाच वर्षांची मुलं शेजारच्या खोलीत झोपलेली होती. पतीच्या संशयी स्वभावाला कंटाळून चैतालीने उचललेले हे टोकाचे पाऊल अनेकांना हादरवून टाकणारे आहे. चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पत्नी चैताली भोईर हिला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोसावी यांनी दिली.
रात्री नक्की काय घडले ?
नकुल भोईर हे समाजकारण आणि विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये, विशेषतः मराठा क्रांती मोर्चा सारख्या संघटनांच्या उपक्रमांमध्ये, अत्यंत सक्रिय होते. त्यांचे काही प्रमुख नेत्यांशी जवळचे संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. भोईर यांची गेल्या काही दिवसांपासून आपल्या पत्नीला नगरसेवक बनवण्याची इच्छा होती. एवढेच नव्हे, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते पत्नीसाठी तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत होते. (Pimpri Chinchwad Crime) मात्र, नकुल आणि त्यांच्या पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणावरून विकोपचा वाद झाला आणि त्यांच्या नात्यात काय घडले, याचा सध्या पोलीस कसून तपास करत आहेत.






