फलटणच्या ‘मधुदीप’ हॉटेलमध्ये ‘त्या’ रात्री डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं? महत्वाची माहिती समोर

On: October 29, 2025 6:01 PM
Dr. Sampada Munde Case
---Advertisement---

Phaltan Doctor Death Case | फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. ज्या हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली त्या मधुदीप हॉटेलचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. या प्रकरणामुळे हॉटेल चर्चेत आले असून, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी याला हत्या प्रकरण ठरवत गंभीर आरोप केले होते. त्यानंतर बुधवारी हॉटेलचे मालक दिलीप भोसले (Dilip Bhosale) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली.

भोसले म्हणाले, “या प्रकरणात आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही पोलिसांना वेळेवर कळवले आणि तपासात पूर्ण सहकार्य केले.” पोलिसांच्या माहितीनुसार, डॉक्टर महिला हॉटेलमध्ये एकटी आली होती, मात्र तीच्या सोबत दुसरा कुणी होता का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मधुदीप हॉटेल मालकाने सांगितली घटनाक्रमाची संपूर्ण माहिती :

दिलीप भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मी गेली 30 ते 35 वर्ष सामाजिक कामात आहे. 23 तारखेला मध्यरात्री सव्वा एक वाजता डॉक्टर आमच्या हॉटेलमध्ये आल्या आणि त्यांनी सांगितले, ‘मला सकाळी बारामतीला जायचं आहे, रूम मिळेल का?’ आम्ही त्यांना रूम दिली.”

भोसले पुढे म्हणाले, “पाच वाजता जेव्हा कोणतीच हालचाल दिसली नाही, तेव्हा आम्हाला संशय आला. पोलिस येण्यास विलंब होत असल्याने आम्ही वकिलांच्या सल्ल्याने दरवाजा उघडला आणि आत जाऊन पाहिलं, तेव्हा ती फासावर लटकलेली दिसली. त्यानंतर आम्ही तात्काळ पोलिसांना पाचारण केलं.”

Phaltan Doctor Death Case | ‘हत्या नव्हे आत्महत्या’; विरोधकांवर हॉटेल मालकांचा आरोप :

भोसले यांनी स्पष्ट केले की, “ही हत्या नसून आत्महत्या आहे. गेली अनेक वर्षं आम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहोत. परंतु काही विरोधक मुद्दाम आमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.” हॉटेलमध्ये त्या रात्री शिफ्ट बदल साडेबारा वाजता झाल्याचेही त्यांनी सांगितले. (Phaltan Doctor Death Case)

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मते, डॉक्टर जेव्हा रूममध्ये आल्या, त्या वेळी त्या अत्यंत घाईत आणि पॅनिक अवस्थेत होत्या. त्यांनी स्वतःची गाडीही आत नेली नाही, ती वॉचमनने पार्क केली. संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात असून तपास सुरू आहे. पोलिस सूत्रांच्या मते, डॉक्टरच्या मृत्यूमागील कारण उघडकीस येण्यासाठी काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.

News Title: Phaltan Doctor Death Case: What Really Happened at Madhudeep Hotel Before the Tragic Incident?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now