डॉक्टर तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारेंची खळबळजनक माहिती!

On: November 3, 2025 2:24 PM
Dr. Sampada Munde
---Advertisement---

Dr. Sampada Munde | फलटण (Phaltan) येथील डॉक्टर संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) आत्महत्या प्रकरणावरून राजकारण तापले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकारने एसआयटी (SIT) नेमल्याचा दावा खोटा असून, केवळ देखरेखीसाठी अधिकाऱ्याची नेमणूक केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘एसआयटी’ नाही, फक्त देखरेख :

ठाकरे (Thackeray) गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सोमवारी फलटण पोलीस ठाण्याला (Phaltan Police Station) भेट देणार आहेत. तत्पूर्वी, त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. “राज्य सरकारने एसआयटी (SIT) नेमल्याचे वृत्त खोटे आहे,” असा दावा त्यांनी केला. आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते (Tejasvi Satpute) यांची नियुक्ती केवळ तपासावर ‘देरखेख’ ठेवण्यासाठी झाली आहे, असे त्यांच्या नियुक्ती पत्रात स्पष्ट म्हटले आहे, असे अंधारे म्हणाल्या.

हा तपास राजकीय प्रभावाखाली असल्याने, आम्ही उच्च न्यायालयाच्या (High Court) निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशीची मागणी करत आहोत आणि त्यासाठी रिट याचिका (Writ Petition) दाखल करणार आहोत, असे त्यांनी जाहीर केले. त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांना सभा घेण्याऐवजी पोलीस ठाण्यात येऊन आरोपपत्र दाखल करण्यास मदत करण्याचे आवाहन केले. तसेच, रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यावर बोलण्यास नकार देत, अजित पवार (Ajit Pawar) नाराज असले तरी सुनील तटकरे (Sunil Tatkare) त्यांना पदावर ठेवू इच्छितात, असा टोला लगावला.

Dr. Sampada Munde | निंबाळकरांची आज सभा; संभाजीनगरमध्ये डॉक्टर संपावर :

डॉक्टर आत्महत्या प्रकरणात विविध आरोप होत असलेले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) हे आज आरोपांचे खंडन करण्यासाठी सभा घेणार आहेत. फलटण (Phaltan) शहरातील ऐतिहासिक गजानन चौकात (Gajanan Chowk) सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. या सभेत निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) काय प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, या प्रकरणाचे पडसाद वैद्यकीय क्षेत्रातही उमटले आहेत. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे मार्ड (MARD) संघटनेने या घटनेचा निषेध करत ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. डॉ. संपदा मुंडे (Dr Sampada Munde) यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

News title : Phaltan Case: No SIT, Alleges Andhare

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now