PF Balance Check | देशातील संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांची पीएफ खाती ईपीएफओच्या माध्यमातून चालवली जातात. दरमहा कर्मचाऱ्याच्या पगारातून ठराविक रक्कम कपात होऊन पीएफ खात्यात जमा केली जाते, त्यासोबतच कंपनीकडून देखील त्याच प्रमाणात रक्कम जमा होते. यामुळे कालांतराने मोठा फंड तयार होतो.
अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यात आतापर्यंत किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती नसते. परंतु ही माहिती जाणून घेणे अगदी सोपे आहे. काही मिनिटांत तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर तुम्ही तुमची पीएफ शिल्लक तपासू शकता. (PF Balance Check)
वेबसाइट आणि मिस्ड कॉलद्वारे शिल्लक तपासा :
पीएफ शिल्लक तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे ईपीएफओची अधिकृत वेबसाईट epfindia.gov.in या पोर्टलवर यूएएन क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. त्यानंतर “मेंबर पासबुक” या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्या खात्यात किती रक्कम जमा आहे, कंपनीने किती रक्कम भरली आहे आणि केव्हा केव्हा पैसे जमा झाले याची माहिती सहज मिळते.
जर तुम्ही वेबसाईटवर लॉगिन करू शकत नसाल तर मिस्ड कॉलचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरून टोल-फ्री नंबर 9966044425 वर कॉल करावा लागेल. कॉल लगेच कट होईल आणि काही सेकंदातच तुम्हाला मेसेजद्वारे शिल्लक रकमेची माहिती मिळेल.
PF Balance Check | एसएमएस आणि उमंग अॅपद्वारेही सोपी तपासणी :
शिल्लक तपासणीचा आणखी एक पर्याय म्हणजे एसएमएस सेवा. यासाठी नोंदणीकृत मोबाइलवरून 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN असा मेसेज पाठवा. काही क्षणांतच तुमच्या मोबाईलवर शिल्लक रकमेची माहिती पोहोचेल.
याशिवाय उमंग अॅपवरून देखील पीएफ खात्याची माहिती पाहता येते. या अॅपमध्ये लॉगिन करून “EPFO” सेवा निवडली की तुमच्या खात्यातील सर्व तपशील मिळतो. यामुळे घरबसल्या अगदी सहज पीएफ खात्याचा ताळेबंद पाहता येतो.
पैसे काढण्यासाठी नियम जाणून घ्या :
शिल्लक तपासल्यानंतर जर तुम्हाला पीएफमधून पैसे काढायचे असतील तर त्यासंदर्भातील नियम समजून घेणे आवश्यक आहे. साधारणतः नोकरी सोडल्यावर, लग्न, वैद्यकीय कारणे, घर खरेदी किंवा शिक्षण यासाठी पीएफमधून पैसे काढता येतात. (PF Balance Check)
प्रत्येक कारणासाठी वेगवेगळे निकष असतात. त्यामुळे पैसे काढण्याआधी नियम व अटींचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. योग्य कारण आणि कागदपत्रे असल्यास ऑनलाइन अर्ज करून काही दिवसांतच पैसे खात्यात जमा होतात.






