Petrol-Diesel Rate | सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. अशात सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये इंधनदर घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती झपाट्यानं खाली येऊ शकतात, असं म्हटलं जातंय.(Petrol-Diesel Rate )
जगातील सर्वात मोठ्या कच्च्या तेल उत्पादक देशांपैकी एक असलेला सौदी अरेबिया आशियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या जवळपास सर्व श्रेणीच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मध्यपूर्वेतील बेंचमार्क दुबईतील घसरणीमुळे सौदी अरेबिया हे पाऊल उचलू शकते, अशी चर्चा आहे.
इंधनदर कमी होणार?
सौदी अरेबियाने जर हा निर्णय घेतला तर भारतातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या किमती कमी करू शकतात. काही मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलंय की, अरब लाईट क्रूडची (Arab Light Crude) अधिकृत विक्री किंमत (OSP) ऑक्टोबर महिन्यात प्रति बॅरल 50 ते 70 सेंट्सनं घसरण्याची शक्यता आहे.(Petrol-Diesel Rate )
चीनकडून सातत्यानं कमी होणारी क्रूड ऑईलची मागणी, हेदेखील क्रूड ऑईलच्या किमतींत घट केली जाण्यामागे मुख्य कारण म्हटलं जातंय. दुसरीकडे, OPEC+ चा पुरवठाही ऑक्टोबरपासून वाढणार आहे. ओपेक गटातील आठ सदस्यांनी पुढील महिन्यात दररोज 180,000 बॅरल उत्पादन वाढवण्याची योजना आखलीये. याचा परिणाम आशियासाठी असलेल्या सुमारे 9 दशलक्ष bpd कच्च्या तेलावर होतो.त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊ शकते, असा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील इंधनदर
महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104.86 रुपये प्रतिलिटर आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 104.95 रुपये प्रति लीटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.16 टक्क्यांनी कमी झाली आहे.
तर, डिझेल 91.31 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. काल 3 सप्टेंबररोजी महाराष्ट्रात डिझेलची किंमत सारखीच होती. म्हणजेच डिझेलच्या दरात कालपासून कोणताही बदल झाला नाही.(Petrol-Diesel Rate )
News Title- Petrol-Diesel Rate likely to fall
महत्वाच्या बातम्या-
खबरदार… विसर्जनानंतर बाप्पाचे फोटो काढाल तर पस्तावाल, पोलिसांचे आदेश काय ?
“काढणीला आलेलं पीक गेलं, सरकारने आता लाडका शेतकरी..”; राज ठाकरेंचं आवाहन
पवार साहेबांनी ‘या’ मतदारसंघातील उमेदवार केला जाहीर; बड्या नेत्याला देणार टक्कर
शनीदेव ‘या’ राशींना करणार धनवान, राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने उजळणार भाग्य
येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट






