Today Petrol Diesel Price | जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. कार, टीव्ही, एसी, फ्रिजपासून बांधकाम साहित्य आणि हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च कमी झाला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला – पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेत का?
नवीन कर प्रणालीमुळे वस्तूंवरील भार कमी झाला असला, तरी पेट्रोल (Petrol Rate) आणि डिझेलचे दर (Diesel Rate) मात्र पूर्वीप्रमाणेच कायम आहेत. कारण हे इंधन अद्याप जीएसटीच्या कक्षेत आलेले नाही. (Today Petrol Diesel Price)
पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये का नाही? :
पेट्रोल आणि डिझेलवरील कर (Diesel price today) हा केंद्र व राज्य सरकारांसाठी महसूलाचा प्रमुख स्रोत आहे. तेल कंपन्यांना पेट्रोल सुमारे ₹52-₹53 प्रति लिटर दराने मिळतं, पण विविध करांमुळे ग्राहकांपर्यंत ते ₹100 पेक्षा जास्त दराने पोहोचतं.
जर पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणलं असतं, तर सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल तोटा सहन करावा लागला असता. जीएसटी 2.0 मुळेच तिजोरीवर अंदाजे ₹48,000 कोटींचा भार वाढणार आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलला जीएसटीमध्ये आणल्यास हा तोटा आणखी प्रचंड झाला असता.
Today Petrol Diesel Price | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर :
मुंबई – पेट्रोल ₹104.21, डिझेल ₹92.15 प्रति लिटर
कोलकाता – पेट्रोल ₹103.21, डिझेल ₹90.76 प्रति लिटर
चेन्नई – पेट्रोल ₹100.75, डिझेल ₹92.34 प्रति लिटर
नवी दिल्ली – पेट्रोल ₹94.72, डिझेल ₹87.62 प्रति लिटर
यावरून स्पष्ट होतं की जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
ग्राहकांसाठी दिलासा कुठे? :
पेट्रोल-डिझेल महागच (GST 2.0 petrol diesel) राहिले असले तरी इतर दैनंदिन वापरातील वस्तू स्वस्त झाल्या आहेत. औषधांवरील जीएसटी कपात, कॅन्सरसह रेयर डिसिजच्या औषधांवर करमाफी हे ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे.
मात्र इंधनाचे दर कमी होईपर्यंत सामान्य नागरिकांच्या खिशाला पूर्ण आराम मिळणं कठीणच दिसत आहे.






