महिन्याच्या शेवटी दिलासा! पेट्रोल-डिझेलच्या दरात झाली घसरण?

On: September 28, 2024 8:39 AM
Petrol-Diesel Price Today 28 September 2024 
---Advertisement---

Petrol-Diesel Price Today | राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक(Petrol-Diesel Price Today) पेट्रोलची किंमत ठरवतात.

जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. आज 28 सप्टेंबर रोजीचे इंधनदर सुधारले आहेत. आजच्या पेट्रोल-डिझेलच्या किमती खाली सविस्तर दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील इंधनदर

महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104.81 रुपये प्रतिलिटर आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 सप्टेंबररोजी पेट्रोलची सरासरी किंमत 104.89 रुपये प्रति लिटर होती, त्या तुलनेत आता किंमत 0.15 टक्क्यांनी कमी झाली आहे.

तर, डिझेल 91.32 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. काल 27 सप्टेंबररोजी देखील महाराष्ट्रात डिझेलची किंमत सारखीच होती. म्हणजेच डिझेलच्या दरात कालपासून कोणताही बदल झाला नाही.(Petrol-Diesel Price Today)

सप्टेंबर महिन्यात 6 तारखेला इंधनदर सर्वाधिक होते. 6 सप्टेंबररोजी पेट्रोल 104.93 रुपये प्रति लिटर दराने विकले गेले. आज 28 सप्टेंबर 2024 रोजी पेट्रोलची किंमत 0.15 टक्क्यांनी कमी होऊन 104.81 रुपये प्रति लिटर झाली.

विधानसभेपूर्वी इंधनदरात घसरण होणार?

महाराष्ट्रात आता लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात लवकरच इंधनदरात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. लिटरमागे किमान 2 रुपयांची कपात होणार, अशी चर्चा आहे. (Petrol-Diesel Price)

लोकसभा निवडणुकीदरम्यान इंधनदरात काही अंशी कपात झाली होती. या व्यतिरिक्त गेल्या दोन वर्षापासून इंधानाच्या दरात कोणतेही बदल झाले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इंधनदरात कपात होईल की नाही?, असे प्रश्न केले जात आहेत. नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. या निवडणुकीपुर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

मेट्रो सिटीमधील इंधनदर

दिल्ली पेट्रोल (प्रति लिटर ) 94.72 तर डिझेल 87.62
मुंबई पेट्रोल (प्रति लिटर ) 103.79 तर डिझेल 91.31
कोलकाता पेट्रोल (प्रति लिटर ) 104.95 तर डिझेल 91.76
चेन्नई पेट्रोल (प्रति लिटर ) 100.75 तर डिझेल 92.34
बेंगलुरु पेट्रोल (प्रति लिटर ) 99.84 तर डिझेल 85.93 (Petrol-Diesel Price Today)

News Title : Petrol-Diesel Price Today 28 September 2024 

महत्वाच्या बातम्या-

सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंची बाजी, युवासेनेने उडवला अभाविपचा धुव्वा

आज शनीदेव ‘या’ राशीच्या जीवनात धन-सुखाचा पाऊस पाडणार!

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणे अडचणीत

भाजपच्या माजी खासदाराने राष्ट्रवादीच्या नेत्याला केली बेदम मारहाण!

PF चे पैसे काढणार असाल तर ही बातमी नक्की वाचा!

Join WhatsApp Group

Join Now