Petrol-Diesel Price | येणाऱ्या काही दिवसांत इंधनदरात मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम हा कच्च्या तेलाच्या किमतीवर होत असल्याचं चित्र दिसून येतंय. त्यामुळे देशात इंधनदरात मोठी वाढ होईल, अशी शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसणार आहे. (Petrol-Diesel Price )
ऐन सणासुदीच्या काळात इंधनदरात वाढ होण्याची चिन्हे आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत 4 ते 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. अगोदर 2 टक्क्यांनी किंमती वाढल्या. त्यानंतर काही दिवसांतच त्यात 5 टक्क्यांची वाढ झाली. भारत देश आखाती देशांसह रशियाकडूनही कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे येणाऱ्या काळात देशात इंधनदर वाढणार, अशी चर्चा सध्या सुरू आहे.
इंधनदरात वाढ होणार?
सध्या कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ उतार दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घसरण झाली होती. तसेच पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात सुधारणा झाल्याची माहिती देखील एका अहवालात देण्यात आली होती. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांनी कमी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. पण आता अशातच कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने किमती वाढू शकतात. (Petrol-Diesel Price )
महाराष्ट्रातील आजचे इंधनदर
राज्यातील पेट्रोलच्या किमती या डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात. त्यामुळे नियमितपणे त्यात सुधारणा केली जाते. दररोज सकाळी पेट्रोलचे दर सुधारले जातात. अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी असे अनेक घटक(Petrol-Diesel Price ) पेट्रोलची किंमत ठरवतात.
महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी किंमत 104. 84 रुपये प्रतिलिटर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 तारखेला देखील किंमत सारखीच होती. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी पेट्रोलची सरासरी किंमत ही 104.96 रुपये प्रतिलिटर होती. त्या तुलनेत आता किंमत 0.12 टक्क्यांनी कमी झाली आहे. तर, डिझेल 89.97 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे.
News Title : Petrol-Diesel Price likely to increase
महत्वाच्या बातम्या-
विमानात जशा ‘हवाई सुंदरी’ तशाच आता ST बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’
आज सर्वपित्री अमावस्या ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ?, वाचा तुमचं राशीभविष्य
अजित पवारांना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता तुतारी फुंकणार
“रोहित पवार शरद पवारांचा पुढील वारसा..”, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?






