‘या’ कारणामुळे सलमान खानसह बिग बॉस 18 अडचणीत सापडणार?

On: October 10, 2024 2:11 PM
Bigg Boss 18
---Advertisement---

Bigg Boss 18 l बिग बॉस हिंदीचा 18 व सिझन 6 ऑक्टोबरला सुरु झाला आहे. हा शो सलमान खान होस्ट करत आहे. यावेळी अनेक दिग्गज स्पधाकरानी बिग बॉसच्या घरात एंट्री केली आहे. अशातच बिग बॉस हिंदीमध्ये या सर्व 18 कटेस्टंटसोबत एक खास पाहुणा देखील घरात पाठवला आहे. तो पाहुणा म्हणजे बिग बॉसच्या घरात एक गाढव पाठवलं आहे. त्या गाढवाचं नाव गधराज असं ठेवण्यात आलं आहे. मात्र आता या गधराज वरून बिग बॉससह सलमान खान देखील अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

बिग बॉस 18 अडचणीत सापडणार :

बिग बॉस हिंदीच्या अठराव्या सीझनमध्ये गधराज (गाढव) चा देखील समावेश आहे. मात्र आता बिग बॉसच्या या खास पाहुण्यामुळे सलमान खानच्या अडचणी वाढणार की काय? असा प्रश्न सर्वचं चाहत्यांना पडला आहे. कारण PETA इंडियाने सलमान खान आणि बिग बॉस हिंदीच्या निर्मात्यांना मनोरंजनासाठी प्राण्यांचा वापर करू नये अशी विनंती केली आहे.

दरम्यान ‘बिग बॉस 18’ मध्ये एका गाढवाला स्पर्धक म्हणून पाठवण्यात आलं आहे. तसेच बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यांना मिळून या गधराजचा सांभाळ करावा लागत आहे. दरम्यान, पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स उर्फ ​​PETA ने या गाढवाला शोमध्ये ठेवण्यावरुन थेट आक्षेप घेतला आहे.

Bigg Boss 18 l पेटानं सलमान खानला पाठवलं पत्र :

PETA इंडिया ही एक सामाजिक संस्था आहे . ती प्राण्यांसाठी काम करत आहे. तसेच प्राण्यांवर होणारे अन्याय आणि अत्याचाराविरोधात पेटा ही संस्था काम करतं आहे. यासंदर्भात PETA इंडियाने एक पात्र देखील लिहलं आहे.

त्यामध्ये नमूद केलं आहे की, “बिग बॉस हा एक विनोदी शो आहे, पण त्या शो मध्ये प्राण्यांचा वापर करणं ही काही हसण्यासारखी गोष्ट नाहीये. कारण गाढव हा नॅच्यरली नर्वस प्राणी आहे. मात्र त्याच्यासाठी आणि इतर प्राण्यांसाठी देखील शो सेटवरील दिवे, आवाज हा पूर्णपणे गोंधळात टाकणारा आणि भीतीदायक आहेत. त्यामुळे टीव्ही शोमध्ये प्राण्याला जागा नाही हे प्रेक्षकांना देखील स्पष्ट झालं आहे, त्यामुळे छोट्या जागेत गाढव अडकलेलं पाहून त्यांना प्रचंड वाईट वाटत आहे.

News Title : PETA Letter To Salman Khan & Big Boss  

महत्वाच्या बातम्या –

रतन टाटांच्या ‘या’ कारने घातला होता बाजारात धुमाकूळ; किंमत फक्त…

“रतन टाटा यांना भारतरत्न द्या”; कुणी केली मागणी?

रतन टाटांचं बॉलिवूडशी खास नातं; मात्र झाले ‘इतक्या’ करोडोंचे नुकसान

‘या’ महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा चौथा हप्ता जमा!

..म्हणून रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही; वाचा त्यांची LOVE Story

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now