थकबाकीदारांना मोठा झटका; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय

On: April 26, 2025 12:18 PM
PCMC Election 2026
---Advertisement---

PCMC  | पिंपरी-चिंचवड शहरातील मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने (PCMC – Pimpri-Chinchwad Municipal Corporation) आता कठोर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या प्रमुख थकबाकीदारांच्या मालमत्ता थेट जप्त केल्या जाणार असून, त्यांचा लिलाव होण्याचीही दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हजारो थकबाकीदारांना अंतिम इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेने (PCMC) चालू आर्थिक वर्षातील (मार्च २०२५ अखेर) मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रक्रिया तीव्र केली आहे. पहिल्या सहामाहीचा कर न भरलेल्या ७९,१९९ मालमत्ताधारकांना यापूर्वी ३० दिवसांची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या सहामाहीचा कर न भरणाऱ्या याच मालमत्ताधारकांना १५ दिवसांची सूचना देण्यात आली.

तरीही कर भरणा न करणाऱ्या ७९,१९९ मालमत्ताधारकांना आता केवळ ७ दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर प्रशासनाकडून थेट मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे. नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्यांवर विभागीय स्तरावर कारवाई सुरू झाली आहे.

जप्ती आणि लिलावाची तयारी पूर्ण

महापालिकेचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे (Avinash Shinde) यांनी सांगितले की, मालमत्ता करातून मिळणारा महसूल हा शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, आरोग्य, उद्याने यांसारख्या अत्यावश्यक सुविधा पुरवण्यासाठी वापरला जातो. जे थकबाकीदार नोटिसांकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करणे क्रमप्राप्त आहे.

वॉरंट बजावूनही कर न भरणाऱ्या मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया सुरू केली आहे, असे शिंदे (Avinash Shinde) यांनी स्पष्ट केले. प्रत्येक थकबाकीदाराच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करून, गरज भासल्यास तिचा लिलावही केला जाईल, असे महापालिकेने (PCMC) स्पष्ट केले आहे. थकबाकीवर आता केवळ २% सवलत उपलब्ध आहे.

Title : PCMC to Seize Properties of Tax Defaulters

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now