हैदराबादचं काय चुकलं? कर्णधार कमिन्सच्या कबुलीने सर्वत्र खळबळ

On: April 18, 2025 11:21 AM
Pat Cummins
---Advertisement---

SRH vs MI 2025 l आयपीएल 2025 (IPL) हंगामात सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) प्रवास अजूनही सावरलेला नाही. गुरुवारी मुंबई इंडियन्सकडून झालेल्या पराभवानंतर कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) पराभवाच्या मुख्य कारणांचा उलगडा केला. वानखेडे स्टेडियमवरील खेळपट्टीचा स्वभाव आणि वेळेवर विकेट्स न मिळणं ही त्याच्या मते प्रमुख कारणं ठरली.

खेळपट्टीने फसवलं, कमिन्सचा स्पष्ट खुलासा :

वानखेडे स्टेडियमवर (Wankhede)  झालेल्या सामन्यानंतर बोलताना पॅट कमिन्सने स्पष्ट केलं की, खेळपट्टी त्यांच्या अपेक्षेपेक्षा पूर्णतः वेगळी होती. त्यांनी गृहित धरलं होतं की पिच जलद असेल, मात्र ते हळूहळू खेळत होतं. त्यामुळे फलंदाजांना स्ट्रोक खेळण्यात अडचण आली. कमिन्सच्या मते, फलंदाजांनी काही अतिरिक्त धावा केल्या असत्या तर सामन्याचं चित्र वेगळं दिसलं असतं.

त्याने मुंबईच्या गोलंदाजांची प्रशंसा करताना म्हटलं, “त्यांनी खरोखरच चांगल्या ओव्हर्स टाकल्या. आम्ही 160 च्या आसपास धावा केल्या, पण त्या अपुऱ्या पडल्या.” त्याने मान्य केलं की संघाकडे चांगले गोलंदाज आहेत, पण या सामन्यात त्यांनी निर्णायक क्षणी विकेट्स घेण्यात अपयश पत्करलं.

SRH vs MI 2025 l फलंदाजीतील कोसळलेली मधली फळी आणि मुंबईची संयमी खेळी :

या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 162 धावा केल्या. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी दमदार सुरुवात देत 59 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतरची मधली फळी सपशेल अपयशी ठरली. हेनरिक क्लासेनने शेवटच्या काही ओव्हर्समध्ये जोरदार खेळण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

मुंबई इंडियन्सने (MI) लक्ष्याचा पाठलाग करताना संयमी आणि स्मार्ट खेळी केली. रायन रिकेल्टन, विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar yadav)  यांनी छोट्या पण महत्त्वाच्या डावांनी संघाला चार विकेट्स राखून विजय मिळवून दिला. सनरायझर्सच्या गोलंदाजीने काही क्षण प्रभाव टाकला, मात्र सातत्य राखण्यात अपयश आलं.

News Title: Pat Cummins Reveals Reason Behind SRH Loss

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now