महाराष्ट्राच्या सुपुत्राची ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी; भारताला तिसरं पदक

On: August 1, 2024 3:02 PM
Paris Olympics 2024 swapnil kusale clicnched bronze medal in 50m rifle 3 position 
---Advertisement---

Paris Olympics 2024 | पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील स्वप्निल कुसळे याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात आज चमकदार कामगिरी करत भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे.

स्वप्निल भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा खाशाबा जाधव यांच्यानंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या कामगिरीनंतर कोल्हापूर येथे एकच जल्लोष करण्यात आला.या स्पर्धेत (Paris Olympics 2024) स्वप्निलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले.

Swapnil Kusale ला कांस्य पदक

तर, चीनचा लिऊ युकुनने सुवर्णपदक जिंकलं. त्याचे गुण 463.6 होते. तर युक्रेनच्या कुलिस सेरहीने रौप्य पदक पटकावलं आहे. भारताकडून स्वप्निलने कांस्य पदकावर नाव कोरले आहे. यामुळे देशभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

स्वप्निल कुसळे हा महाराष्ट्राचा सुपुत्र असून तो कोल्हापूर येथील कांबळवाडी गावातील रहिवासी आहे. तो 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. आता 12 वर्षांच्या (Paris Olympics 2024) प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्वप्निल कुसळेने ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करत विजयी कामगिरी केली.

भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरं पदक

6 ऑगस्ट 1995 मध्ये जन्मलेल्या स्वप्निलने पॅरिसमध्ये भारताचे नाव उंचावले आहे. त्याचा इथ पर्यंतचा प्रवासही खूपच रंजक राहिला आहे. अभिनव बिंद्राला 2008 च्या ऑलिम्पिकमध्ये खेळताना पाहण्यासाठी स्वप्निलने 12वीच्या परिक्षेकडे कानाडोळा केला. 2009 मध्ये वयाच्या 14व्या वर्षी त्याच्या वडिलांनी स्वप्नीलला महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा प्रबोधिनी योजनेत दाखल केले.

येथूनच स्वप्निलचा प्रवास सुरू झाला. स्वप्निल कुसळे हा 2015 पासून मध्य रेल्वेत कार्यरत आहे.स्वप्नील मध्य रेल्वेमध्ये तिकीट कलेक्टर म्हणून काम करतो. आज 1 ऑगस्ट रोजी त्याने (Paris Olympics 2024) रायफल थ्री पोजीशन प्रकारात चमकदार कामगिरी करत भारताला कांस्य पदक मिळवून दिले.

News Title-  Paris Olympics 2024 swapnil kusale clicnched bronze medal in 50m rifle 3 position

महत्वाच्या बातम्या-

पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत मिळणार मोठी जबाबदारी?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका; LPG सिलेंडरच्या किंमतीत वाढ

ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस शुभ की अशुभ?, वाचा आजचे राशीभविष्य

दहावी पास तरुणांसाठी थेट सरकारी नोकरीची संधी; होमगार्ड पदांसाठी भरती सुरू

Join WhatsApp Group

Join Now