“..पेक्षा मोठा पश्चाताप कोणताच नाही”; परिणीती चोप्राच्या वैवाहिक आयुष्यात वादळ?

On: July 26, 2024 12:46 PM
Parineeti chopra cryptic post after get married
---Advertisement---

Parineeti chopra | बॉलीवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा हीने गेल्या वर्षी 24 सप्टेंबर रोजी आप पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांच्या लग्नाला आता जवळपास 10 महीने झाले आहेत. अशात परिणीतीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे त्यांच्यात (Parineeti chopra) काहीतरी बिनसल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

परिणीती हीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये होडीत बसलेल्या परिणीतीच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे. अभिनेत्रीने नो-मेकअप लूकमध्ये मोठी पोस्ट देखील लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

परिणीती चोप्राची पोस्ट चर्चेत

“या महिन्यात मी काही काळ थांबून विचार केला… यातून मला एक गोष्ट विश्वासाने पुन्हा कळली ती म्हणजे मानसिकताच सर्वकाही आहे. महत्त्वहीन गोष्टींना (लोकांना) महत्त्व देणं बंद करा. आयुष्यातील एकही सेकंद वाया घालवू नका. आयुष्य टीक-टीक करणारं एक घड्याळ आहे. प्रत्येक वेळी स्वतःच्या भावनांना महत्त्व द्या… कृपया दुसऱ्यांसाठी जगणं सोडा…”, अशा आशयाची पोस्ट परिणीतीने केली आहे. यासोबतच तिने (Parineeti chopra) एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

“जेव्हा तुम्हाला इतरांच्या मताची भीती वाटते तेव्हा तुम्ही स्वतःचं जीवन जगणं थांबवता. आणि तुमच्या शेवटच्या दिवशी, यापेक्षा मोठा पश्चाताप कोणताच असणार नाही. स्वतःचा आनंद शोधा आणि विषारी लोकांना आयुष्यातून बाहेर हकला.”, असंही अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

परिणीतीच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत

पुढे ती म्हणाली की, “जगाचा विचार करणं बंद करा. अगोदर स्वतःचा विचार करा.तःला आणि तुमच्या लोकांना आनंदी ठेवा. इतर गोष्टींप्रती असणारी तुमची प्रतिक्रिया आधी बदला… आयुष्यात आनंदी राहण्याची हिच एक चावी आहे. जीवन मर्यादित आहे… जे काही आहे ते आज आणि याक्षणी आहे… तुम्हाला जसं हवंय तसं जगा.”

दरम्यान, परिणीती चोप्राने केलेली ही पोस्ट आता जोरदार व्हायरल झाली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टमुळे वेगवेगळ्या चर्चा रंगत आहे. चाहत्यांना देखील चिंता पडली आहे. ‘लग्नानंतर तू त्रस्त आहेस का?’, ‘ही पोस्ट कोणासाठी आहे?’,अशा प्रतिक्रिया नेटकरी परिणीतीच्या पोस्टवर देत आहेत. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त परिणीती (Parineeti chopra) आणि खासदार राघव चड्ढा यांचीच चर्चा रंगत आहे.

News Title –  Parineeti chopra cryptic post after get married

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यभरात पावसाचा धुमाकूळ! ‘या’ जिल्ह्यांतील शाळांना 8 दिवस सुट्ट्या जाहीर

“हिंदू महिलांनी फिगर मेन्टेन करणं सोडा, 4 मुलं जन्माला घाला”; प्रेमानंद महाराजांचं वादग्रस्त विधान

“घरातील एकटेपणा खायला उठतो, तो कमी करण्यासाठी मी..”; अभिनेत्री रेखा यांचं मोठं वक्तव्य

“ठाकरे, पवार, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा..”; जरांगे पाटील यांचा थेट इशारा

मोठी बातमी! पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक बंद, प्रवाशांचे प्रचंड हाल

Join WhatsApp Group

Join Now