‘घरात अचानक…’; शेफाली जरीवालाबाबत पती पराग त्यागीचा धक्कादायक खुलासा!

On: October 20, 2025 6:00 PM
Shefali Jariwala
---Advertisement---

Shefali Jariwala | ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे (Shefali Jariwala) हृदयविकाराच्या झटक्याने निधन होऊन आता काही महिने उलटले आहेत. २७ जून २०२५ रोजी वयाच्या ४२ व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. तिचा पती, अभिनेता पराग त्यागी (Parag Tyagi) अजूनही या दुःखातून सावरलेला नाही. तो सतत तिच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्याने एक असा अनुभव सांगितला आहे, ज्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटले आहे. परागच्या म्हणण्यानुसार, त्याला आजही घरात शेफालीच्या आत्म्याचा (Spirit) वावर जाणवतो.

घरात आजही जाणवते शेफालीची उपस्थिती

शेफालीच्या निधनानंतर पराग खूप खचून गेला होता. आपला एकाकीपणा दूर करण्यासाठी आणि तिच्या आठवणी ताज्या ठेवण्यासाठी तो सोशल मीडियाचा आधार घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो इंस्टाग्रामवर शेफालीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. नुकताच त्याने तिच्या नावाचा टॅटूसुद्धा काढला होता. आता त्याने त्याच्या पॉडकास्ट चॅनेलवर (Podcast Channel) एका गूढ अनुभवाविषयी सांगितले आहे.

Shefali Jariwala | अचानक आला कापराचा सुगंध अन्…

परागने सांगितले की, त्याची रोजची एक दिनचर्या आहे – सकाळी उठून प्रार्थना आणि ध्यान करणे व संध्याकाळी घरी दिवा लावणे. एका संध्याकाळी तो दिवा लावत असताना घरात लावलेल्या शेफालीच्या फोटोंकडे पाहून तो रडू लागला. “तो म्हणाला, ‘मी खूप रडत होतो आणि म्हणालो, ‘बाबू, तू मला का सोडून गेलीस, माझ्या मैत्रिणी?’ आणि त्याच क्षणी, मला अचानक कापराचा (Camphor) तीव्र सुगंध येऊ लागला.'” परागच्या मते, शेफालीला घरात कापूर जाळायला खूप आवडत असे. “तो सुगंध कुठून येतोय हे पाहण्यासाठी मी उठलो, पण घरात कुठेही कापूर जळत नव्हता,” असे परागने सांगितले. “शेवटी मी हसून म्हणालो, ‘बाबू, तू माझ्या शेजारीच आहेस ना?'”

पराग पुढे म्हणाला की, हे वाक्य उच्चारताच त्याला डोक्यापासून पायापर्यंत एक तीव्र ऊर्जा जाणवली. त्याचे केस उभे राहिले आणि कोणीतरी त्याला घट्ट मिठी मारल्यासारखे वाटले. “मी त्या अनुभवाचे शब्दात वर्णन करू शकत नाही,” असे तो म्हणाला. महत्त्वाचे म्हणजे, परागने स्पष्ट केले की हा अनुभव अजिबात भयावह नव्हता, उलट तो खूप दिलासा देणारा होता. जणू कोणीतरी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला होता, असे त्याला वाटले. या अनुभवानंतर, शेफाली आजही आपल्या आसपास अदृश्य रूपात अस्तित्वात आहे, यावर परागचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

News Title- Parag Tyagi Feels Shefali’s Presence?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now