मुंबई | विधानसभा निवडणुकीच्या आधी बीडमध्ये मोठी उलथापालथ होत असल्याचं दिसतंय. भाजप (Bjp) नेत्या पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या नेत्याने पदाचा राजीनामा देऊन जरांगे यांची भेट घेतली आहे. भाजपचे (Bjp) बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. राजेंद्र म्हस्के यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
पंकजा मुंडेंना धक्का
राजेंद्र म्हस्के बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. काल जरांगे पाटील यांनी त्यांचे उमेदवार येत्या विधानसभेत उभे करणार असल्याची घोषणा केल्यानंतर आज राजेंद्र म्हस्के यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
भारतीय जनता पार्टीमध्ये (Bjp) मी गेल्या सहा वर्षापासून जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो. मी काल कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. त्यात निर्णय झाला की भारतीय जनता पक्षाचा राजीनामा द्यायचा. मागच्या निवडणुकीत बीड विधानसभेसाठी आम्ही इच्छुक होतो, युतीमध्ये ती जागा शिवसेनेला सुटली. त्यावेळी आम्हाला थांबावं लागलं, असं त्यांनी सांगितलं.
तुम्हाला विधानसभा लढवायची आहे, असं नेतृत्वाने एक वर्षांपूर्वी सांगितलं होतं. परंतु परिस्थिती बदलली आहे. मतदारसंघाकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे, असंही राजेंद्र म्हस्के म्हणाले.
आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या कानावर टाकला. काल त्यांनी बैठक घेऊन निर्णय घेतला. त्या अनुषंगाने त्यांना माहीत असावं यासाठी त्यांची भेट घेतली. इच्छुकांनी अर्ज करावेत असं जरांगे पाटील म्हणाले होते, म्हणून मी त्यांच्याकडे मागणी केली आहे, असंही राजेंद्र म्हस्के यांनी सांगीतलं.
दरम्यान, कालच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार देणार असल्याचं जाहीर केलं आहे. पण ज्या ठिकाणी मराठा समाजाची ताकद आहे तिथे उमेदवार देणार, असं त्यांनी जाहीर केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भाजपमध्ये बंडखोरीला सुरवात? ‘या’ नेत्याची सागर बंगल्यावर धाव
उमेदवारी न मिळाल्याने नगरमध्ये नाराजी नाट्य; भाजपचा बडा नेता बंडाच्या तयारीत?
दिवाळीला पोत्यानं पैसे घ्या… ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
अखेर जरांगे पाटलांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ जागांवर देणार उमेदवार
शनीची चाल करणार कमाल, दिवाळीपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार!






