पंकजा मुंडे यांचं जरांगेंच्या मेळाव्याबाबत सर्वात मोठं विधान!

On: October 12, 2024 1:34 PM
Pankaja Munde
---Advertisement---

Pankaja Munde l आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यात अनेक राकीय मेळावे पार पडत आहेत. अशातच आज बीडमध्ये देखील दोन दसरा मेळावे होत आहेत. यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगाव येथे होत आहे. तसेच या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण भाऊ दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. याशिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार आहेत.

आज बीडमध्ये दोन मेळावे :

अशातच दुसरीकडे नारायण गडावर मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. तसेच आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष सुरू झालेला आहे.

मात्र आता या पार्श्वभूमीवर या दोन्ही मेळाव्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. तसेच आता हे दोन्ही नेते काय बोलणार याची देखील उत्सुकता सर्वाना लागली आहे. अशातच आता पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटील यांच्याबद्दल एक विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चांना उधाण आलं आहे.

Pankaja munde l जरांगे यांच्या मेळाव्याशी आमचा काहीही संबंध नाही :

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, मी भाषणात काय बोलणार आहे हे मी आताच सांगणार नाही. तसेच आजच्या भाषणातच सर्व परिस्थितीवर मी बोलणार आहेत. याशिवाय नारायण गडावर देखील आज एक मेळावा होत आहे. तसेच आमचा मेळावा हा तर दरवर्षी होत असतो. पण नारायण गडावर आज मेळावा होतोय हे देखील खरं वैशिष्ट्ये आहे.

जरांगे पाटील हे नारायण गडावरच्या मेळाव्याला आज येणार आहेत. मात्र ते काय बोलतील याची देखील उत्सुकता सर्वांना लागली आहे, असं सांगतानाच मनोज जरांगे यांचा मेळावा हा काही पारंपारिक नाही. त्यामुळे ते काय बोलणार हे देखील ऐकायचं आहे. याशिवाय आमचा मेळावा हा पारंपारिक आहे. त्यामुळे त्यांच्या मेळाव्याशी आमचा काहीही संबंध नाही, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

News Title – Pankaja munde on manoj jarange maratha reservation dussehra rally

महत्त्वाच्या बातम्या-

दसऱ्याच्या दिवशी चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका; अन्यथा अडचणींमध्ये होईल वाढ

“..हीच वचपा काढण्याची, क्रांतीची वेळ”; राज ठाकरेंचं मतदारांना आवाहन

कोकण हार्टेड गर्लचे सूर जुळले; सांगितलं बॉयफ्रेंडच नाव

विखे पाटलांच्या आशीर्वादाने पुण्यातील ‘या’ भागातील दोनशे कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न!

सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना मोठं आवाहन; थेट म्हणाले..

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now