Pankaja Munde Dussehra Melava | भाजपच्या नेत्या तथा राज्य सरकारमधील पशुसंवर्धन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथे दसरा मेळाव्याचे (Pankaja Munde Dasara Melava) आयोजन केले होते. या मेळाव्याला मोठी गर्दी जमली होती. दसरा मेळाव्यात या वर्षी मोठा वाद निर्माण झाला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या समर्थनाचे फोटो आणि पोस्टर कार्यकर्त्यांनी मेळाव्यात प्रदर्शित केले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या मेळाव्याला धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचीही उपस्थिती होती.
चर्चांना उधाण :
पंकजा मुंडेंचा या दसरा मेळाव्यात समर्थकांकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक आणि आरोपी वाल्मिक कराड यांचे फोटो, पोस्टर झळकले. या पोस्टरवर ‘We support walmik Anna’, ‘कराड आमचे दैवत’, असा मजकूर दिसत आहे. यामुळे चर्चांना चांगलेच उधाण आले. हे पोस्टर सोशल मीडिया वर चांगलेच व्हायरल झाले आहेत. वाल्मिक कराड हा केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असून तो सध्या तुरुंगात आहे. (Walmik Karad)
सावरगाव घाट येथील भगवान भक्ती गडावर हा दसरा मेळावा (Pankaja Munde Dasara Melava) पार पडला. पंकजा मुंडे या मेळाव्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने पोहोचल्या. यावेळी धनंजय मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या.
Pankaja Munde Dussehra Melava | अंजली दमानिया यांचा संताप :
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत राजकीय वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हे कृत्य अत्यंत खेदजनक असून, असा एखादाही बॅनर लागला असेल, तर आपल्याला लाजेने मान खाली घालावी लागेल. ही राजकारणाची अधोगती आहे, अशी टीका दमानिया यांनी केली. (Anjali damaniya)
‘वाल्मिक कराड यांच्याबद्दल त्यांचे वैयक्तिक मत काय आहे?’, धनंजय मुंडेंना विचारून उपयोग नाही, कारण ती तर ‘गॉन केस’ आहे, अशी टीका करत दमानिया यांनी पंकजा मुंडे यांना थेट प्रश्न विचारण्याची मागणी केली आहे.






