…XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही; पंकजा मुंडे असं कोणत्या नेत्याला म्हणाल्या

On: September 6, 2024 4:35 PM
Pankaja Munde
---Advertisement---

Pankaja Munde l राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. भाजपमध्ये जे पी नड्डा यांच्या हस्ते माझा भाजप पक्षात प्रवेश झाला होता, तो त्यांनी जाहीर करायला हवा होता. मात्र मंत्री गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्याने तो पक्ष प्रवेश जाहीर झाला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आता यावर भाजपच्या विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांना विचारले असता त्यांनी XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही, असे उत्तर दिले आहे.

XYZ माणसाबद्दल मी काहीही बोलत नाही :

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, राहाता येथील पंचायत समितीच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. या सोहळा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला आहे. कारण भाजप नेत्या पंकजा मुंडे या ग्रामविकास मंत्री असताना राहाता येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या कामास मंजुरी मिळाली होती. यावेळी सोहळ्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.

यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी यावर काय बोलणार? अमूक कोणी म्हटले म्हणून म त्यावर टिप्पणी करत नाही. कारणमी भूमिकेवर राजकारण करते. काय काम झालं पाहिजे यावर मी लक्ष देते. त्यामुळे XYZ माणसाबद्दल मी काहीही बोलत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Pankaja Munde l लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद :

राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवाद सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे. यासंदर्भात पंकजा मुंडे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजना ही प्रचंड मोठी योजना आहे. लोकांना देखील ही योजना प्रचंड आवडली आहे. आम्ही सगळे जरी कामाला लागलो तरी सर्वांपर्यंत पोहचू शकत नाही. त्यामुळे आमच्यात कुठंही चढाओढ नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

यासंदर्भात महाविकास आघाडीकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे. याबाबत विचारले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, दोन पक्ष वेगवेगळ्या पद्धतीचे राजकारण करतात. विरोधी पक्ष हार घालून सत्कार करतील, अशी अपेक्षा कधीही नसते. कारण विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.

News Title : Pankaja munde statement on eknath shinde

महत्त्वाच्या बातम्या-

वस्तादने एक डाव राखून ठेवलाय; बापासोबत कायम राहा…; अजितदादांचा सल्ला

कोरोनापेक्षाही धोकादायक आजार; शरीराचा ‘हा’ भाग करतोय खराब

भाजपने ‘या’ 4 नेत्यांवर टाकली विधानसभा निवडणुकीची जबाबदारी!

रामदास कदम यांना घरातूनच मिळणार मोठा झटका!

पिवळ्या दातामुळे चारचौघांत होतंय हसू?, लगेच ‘हा’ उपाय करा, हिऱ्यासारखी येईल चमक

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now