शरद पवारांनी गेम पलटवला! बड्या नेत्याला मोठा धक्का

On: November 12, 2024 12:33 PM
Sharad Pawar
---Advertisement---

Sharad Pawar l राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यावेळी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. अशातच राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी देखील सुरु आहे. मात्र सध्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात उडत आहेत. अशातच विधानसभा निवडणुकी दरम्यान शरद पवार यांनी रयत क्रांती सेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे.

सदाभाऊ खोत यांना मोठा धक्का :

यावेळी रयत क्रांती सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी पांडुरंग शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. यावेळी जळगावमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. मात्र यावेळी पांडुरंग शिंदे यांनी रयत क्रांती संघटना सोडण्यामागचे कारण देखील सांगितले आहे.

सदाभाऊ खोत यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. परंतु मला ही टीका पटली नाही. त्यामुळे मी आता हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं पांडुरंग शिंदे म्हणले आहेत. तसेच सध्या सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून देखील लांब गेलेले आहेत. त्यामुळे त्यांचे काम हे व्यक्ती केंद्रीत झाले आहे अशी टीका पांडुरंग शिंदे यांनी केली आहे.

Sharad Pawar l सदाभाऊ खोतांवर कार्यकर्ते नाराज :

सध्या सदाभाऊ खोत यांच्या विषयी पक्षातील अनेक दिग्गज नेतेमंडळी व कार्यकर्ते देखील नाराज असल्याचं दिसून येत आहे. कारण सध्या माझ्या संपर्कात जिल्ह्यातील तब्बल 25 कार्यकर्ते आहेत. मात्र ते देखील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचा दावा पांडुरंग शिंदे यांनी केला आहे.

मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने सदाभाऊ खोत यांना हा सर्वात मोठा धक्का बसला असल्याचे म्हंटले जात आहे.

News Title –  pandurang shinde join sharad pawar party

महत्त्वाच्या बातम्या-

…म्हणून भुजबळांना मुख्यमंत्री केलं नाही; शरद पवारांनी सांगितलं कारण

थंडीचा कडाका वाढला असतानाच राज्यावर पावसाचंही सावट, पुढील 3 दिवस..

हिंदूंच्या संख्येत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांची घट; कोणाचा वाढला आकडा?

“शिंदेंच्या सर्व उमेदवारांना 25 कोटी…”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

अजितदादांची चिंता वाढली, भाजपच्या बड्या नेत्याचा घड्याळाविरोधात प्रचाराचा इशारा

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now