“जगून काय फायदा म्हणून त्यांनी असं..”, श्रीनिवास वनगांच्या बायकोने शिंदेंवर केला गंभीर आरोप

On: October 29, 2024 6:12 PM
palghar
---Advertisement---

Palghar | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकिय पक्षाने उमेदवारांच्या याद्या जाहिर केल्या असून उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. दरम्यान राजकिय पक्षातील काही नेत्यांना तिकीट मिळालेलं नाहीये. त्यामुळे नेत्यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. याचवेळी शिंदे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी आयुष्य संपवण्याची भाषा केली असून सध्या ते नाॅट रिचेबल आहेत.

काय आहे प्रकरण?

शिवसेनेचे पालघरचे (Palghar) शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांना विधानसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे ते डिप्रेशनमध्ये असल्याचं वनगा यांच्या पत्नीने सांगितलं आहे. वनगा हे मागील बारा तासांपासून नॉट रिचेबल आहे.

आमदार श्रीनिवास वनगा यांचा त्यांच्या कुटुंबीयांसोबत देखील कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय सध्या चिंतेत आहेत. विधासनभा निवडणुकीचं तिकीट शिंदे गट शिवसेनेकडून नाकारल्याने दोन दिवसांपासून आमदार श्रीनिवास वनगा डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीने काही आरोप केले आहेत.

काय म्हणाल्या सुमन वनगा?

माध्यमांशी बोलत असताना वनगा (Palghar) यांच्या पत्नी सुमन वनगा म्हणाल्या की, श्रीनिवास वनगा यांनी (28 ऑक्टोबर) ला रात्री पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर घरातून एका पिशीवीत काही कपडे घेऊन ते गेले अन् नॉट रिचेबल झाले आहे. जाण्यापूर्वी त्यांनी माध्यमांकडे मन मोकळं केलं होतं. ते ढसाढसा रडले होते. ते म्हणाले की, जगून काय फायदा आहे? मला साहेबांनी डावललं म्हणजे मी इतका वाईट आहे का? आमचा विश्वासघात झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता ते नॉट रिचेबल झाल्यानंतर आम्ही सर्व चिंतेत आहोत.

दरम्यान, वनगा यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त लावला आहे. एकनाथ शिंदे यांनी आमचा विश्वासघात केला आहे, असं श्रनिवास वनगा त्यांच्या कुटुंबियांनी म्हटलं आहे. उमेदवारी न मिळाल्यामुळे अस्वस्थ झालेले आमदार श्रीनिवास वनगा हे आपली इनोव्हा कार आणि बॉडीगार्डला काहीच न सांगता पायी घर सोडून निघून गेले आहेत.

News Title : Palghar srinivas vanga not reachable

महत्त्वाच्या बातम्या-

खुशखबर! ‘या’ बँकांकडून मिळतंय सर्वात स्वस्त होम लोन

शरद पवारांनी भरसभेत केली अजित पवारांच्या रडण्याची नक्कल!

निवडणुकीच्या तोंडावर आमदार गायब झाल्याने राज्यात खळबळ!

मोठी बातमी! पुण्यात महायुतीमध्ये बिघाडीला सुरवात

माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला, अजित पवारांकडून बडा उमेदवार मैदानात

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now