Maharashtra l विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवाणसावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक खळबळजनक घडामोड घडली आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर देण्यात आली आहे. मात्र यामुळे सध्याचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नाराज झाले आहेत. अशातच आता श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल आहेत.
विद्यमान आमदारचं तिकीट कापल्याने नाराज :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकीट शिंदे गटाने कापण्यात आले आहे. त्यामुळे ते वरिष्ठांवर नाराज असल्याचं समजत आहे. मात्र आता विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे काल रात्रीपासून गायब झाले असल्याचे समजत आहे. कारण गेल्या १२ तासांपासून श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे आता पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.
शिंदे गटाने काल उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यावेळी पालघर विधानसभा मतदारसंघातून श्रीनिवास वनगा याना डावलून शिंदे गटाकडून माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी दिली. मात्र यामुळे श्रीनिवास वनगा हे नाराज झाले होते. तसेच माजी खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार श्रीनिवास वनगा यांच्याशी देखील चर्चा केली होती.
Maharashtra l पोलीस शोध घेत आहेत :
मात्र राजेंद्र गावित यांना उमेदवारी यादी जाहीर होताच श्रीनिवास वनगा हे रडत आपली फसवणूक झाल्याचे म्हणाले. तसेच ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देवमाणूस होते. मात्र मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा देखील घात झाला असे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा म्हणाले होते.
यानंतर गेल्या १२ तासांपासून श्रीनिवास वनगा गायब झाल्याने पत्नी सुमन वनगा यांनी ही माहिती दिली आहे. तसेच श्रीनिवास वनगा हे काल संध्याकाळी सातच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यावेळी ते दोन्हीही मोबाईल बंद करुन घरातून निघून गेले. मात्र घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्यांनी एका पिशवीत त्यांचे काही कपडे भरले आणि ती पिशवी घेऊन श्रीनिवास वनगा हे घराबाहेर पडले आहेत. मात्र आता श्रीनिवास वनगा हे घराबाहेर पडून बराच कालावधी उलटल्याने त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
News Title – Palghar Shivsena Shinde Group MLA Shrinivas Vanga missing
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! पुण्यात महायुतीमध्ये बिघाडीला सुरवात
माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला, अजित पवारांकडून बडा उमेदवार मैदानात
लक्ष्मी पावली! धनत्रयोदशीला सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचे भाव
“शूटिंग सुरु असताना मी सलमानला बाजूला घेऊन गेले आणि”,’या’ अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा
शरद पवार गटाचे आणखी 5 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात, कोणाकोणाला मिळाली संधी?






