‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर पुन्हा शोषणाचे आरोप, ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका

On: September 27, 2024 10:29 AM
Palak Sidhwani aka Sonu left TMKOC series
---Advertisement---

TMKOC | सब टीव्हीवरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अजूनही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. बऱ्याच कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. त्यांच्या जागी आता नवीन कलाकार आले आहेत. अशात प्रेक्षकांसाठी एक वाईट (TMKOC) बातमी समोर आली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानीने मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केलाय. यासोबतच तिने शोषणाचे आरोप देखील केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील एका अभिनेत्रीने असेच शोषणाचे आरोप केले होते.

‘सोनू’ उर्फ पलक सिधवानीने सोडली मालिका

मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पलक सिधवानीला निर्मात्यांनी कायदेशीर नोटिस पाठवली आहे. पलकने कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप नोटिसमध्ये करण्यात आला आहे. निर्मात्यांची लेखी परवानगी न घेता पलकने इतर ब्रँडसोबत काम केल्याने कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप नोटिसमध्ये करण्यात आला आहे. (TMKOC)

यावर अभिनेत्री पलक सिधवानीने प्रतिक्रिया दिली आहे. मालिका सोडत असल्यामुळेच निर्माते अशा पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत मोठा खुलासा केला आहे. मात्र, या सर्व प्रकरणामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

निर्मात्यांकडून ‘सोनू’ला कायदेशीर नोटीस

“मी 8 ऑगस्ट रोजीच मालिका सोडण्याच्या निर्णयाबाबत निर्मात्यांना कळवलं होतं. त्यांनी काही वेळ मागितला आणि त्यानंतर ते मला अधिकृतरित्या मेल पाठवणार होते. त्याच मेलवर मला राजीनाम्याचं पत्र लिहिण्यास त्यांनी सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांनी मला मेल पाठवलाच नाही. त्यांनी माझा राजीनामा स्वीकार केला नाही आणि त्याच्या काही दिवसांतच माध्यमांमध्ये माझ्याविरोधात बातम्या दिसून आल्या”, असं पलक सिधवानी म्हणाली आहे. (TMKOC)

 

View this post on Instagram

 

A post shared by Palak Sindhwani (@palaksindhwani)

तसेच मी पाच वर्षांपूर्वी या मालिकेसोबत करार केला होता आणि त्यांनी मला त्याची कॉपीसुद्धा दिली नाही. त्यांनी मला इतर जाहिराती करण्यासाठी परवानगी दिली होती. आता मला मालिका सोडायची तर ते माझ्यावर असे आरोप करत आहेत. खरंतर हे एकप्रकारे शोषणच आहे, असा आरोप ‘सोनू’ उर्फ पलक सिधवानीने केला आहे.

News Title – Palak Sidhwani aka Sonu left TMKOC series

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपकडून अजितदादा गटाची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न?, ‘या’ नेत्याला केंद्रात मिळाली मोठी जबाबदारी

लाडक्या बहीणींसाठी गुड न्यूज, योजनेसाठी अर्ज करण्यास मिळणार मुदतवाढ?

आज शिवयोगात ‘या’ राशींचं भाग्य फळफळणार, सर्व गोष्टीत यश मिळणार!

मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, रूग्णालयात दाखल

शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक कोण? तर राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक कोण?

Join WhatsApp Group

Join Now