ICC ची अजब कारवाई! पाकच्या फरहानला फक्त वॉर्निंग, पण भारताच्या सूर्याला भरावा लागणार ‘इतका’ दंड!

On: September 27, 2025 1:58 PM
Asia Cup 2025
---Advertisement---

Asia Cup 2025 | ICC ने भारत व पाकिस्तानच्या खेळाडूंवर सामन्यांदरम्यान घडलेल्या घटनांवरून कारवाई केली आहे. पण ही कारवाई करताना ICC ने पक्षपात केला आहे. 21 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये Asia Cup 2025 सामना रंगला. पण या सामन्यात भारताने पाकला नेहमीप्रमाणे धूळ चारली.  (IND Vs PAK)

फरहानने बॅटला बंदुकीचे रूप देऊन गोळीबार केल्याचा इशारा :

या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंकडून आक्षेपार्ह वर्तन करण्यात आले होते. सामान्या दरम्यान पाकचा खेळाडू साहिबजादा फरहान हा पाहिल्यात बॉल वर आऊट झाला पण पुढे त्याला जीवदान मिळाले. या जीवदानाचा फायदा घेत फरहानने 58 रणांची खेळी साकारली.

अर्धशतक पूर्ण झाल्यावर फरहानने बॅटला बंदुकीचे रूप देऊन गोळीबार केल्याचा इशारा केला. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात कसा गोळीबार करण्यात आला, हे फरहानने दाखवल्याचे म्हटले जात आहे. या कृत्याबाबत ICC ने जेव्हा त्याला विचारणा केली तेव्हा त्याने विराट कोहलीचा संदर्भ दिला. विराटनेही असे कृत्य केले असल्याचे त्याने सांगितले. याबाबत ICC त्यावर कारवाई न करताच सोडून दिले.

सूर्याला 90 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार :

दरम्यान, सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने पत्रकार परिषदेमध्ये एक वक्तव्य केले होते. ” पाकिस्तानवर मिळवलेला हा विजय आम्ही भारताच्या सशस्त्र दलांना समर्पित करतो. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात ज्या भारतीयांचा हकनाक बळी गेला, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी आम्ही कायम उभे आहोत. ” असे त्याने वक्तव्य केले होते.

ICC ने याबाबत सूर्याला (Suryakumar Yadav) विचारणा केली असता त्याने यामध्ये आपली कोणतीही चूक नसल्याचे स्पष्ट केले. पण तरीसुद्धा ICC ने त्यावर कारवाई केली. सूर्यावर त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 30 टक्के एवढी रक्कम दंड म्हणून कापण्यात येणार आहे. भारतीय खेळाडूंना प्रत्येक सामन्यासाठी 3 लाख रुपये मिळतात, त्यामुळे सूर्या यावेळी 90 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचे समोर आले आहे.

पाकचा खेळाडू हॅरिस रौफ वर सुद्धा ICC कारवाई केली आहे. त्यालाही ३० टक्के मानधनातील रक्कम दंडाच्या स्वरुपात द्यावी लागणार आहे.

News title : Pakistan’s Farhan gets warning, but India’s Surya will have to pay a huge fine, ICC’s strange action

Join WhatsApp Group

Join Now