एअर स्ट्राईकच्या भीतीने पाकिस्तानने उचलली ८ मोठी पाऊले!

On: April 24, 2025 6:43 PM
Pahalgam
---Advertisement---

Pahalgam | पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तान बिथरला असून, इस्लामाबादमध्ये वेगाने हालचाली सुरू आहेत. भारताच्या संभाव्य एअर स्ट्राईकच्या भीतीने पाकिस्तानने आक्रमक पवित्रा घेत अनेक द्विपक्षीय करार रद्द केले आहेत आणि ८ मोठे निर्णय जाहीर करत भारताला युद्धाचा इशारा दिला आहे.

सिंधू पाणी करार रद्द

भारताने सिंधू पाणी करार (Indus Waters Treaty) स्थगित करण्याच्या निर्णयाला पाकिस्तानने (Pakistan) कडाडून विरोध केला आहे. पाण्याची दिशा बदलण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास तो ‘युद्धाचा हल्ला’ समजला जाईल, असा थेट इशारा पाकिस्तानने (Pakistan) दिला आहे. भारताची भूमिका बदलेपर्यंत शिमला करार (Shimla Agreement) आणि इतर सर्व द्विपक्षीय करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आले आहेत.

वाघा सीमेवरील (Wagah Border) वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली असून, केवळ ३० एप्रिल २०२५ पर्यंतच परत येण्याची परवानगी दिली जाईल. या निर्णयांमुळे दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला आहे.

व्हिसा रद्द ते ‘फुल-स्पेक्ट्रम’ प्रतिसादाची धमकी

पाकिस्तानने (Pakistan) भारतीय नागरिकांसाठी जारी केलेले सर्व सार्क व्हिसा (SAARC Visa) (शीख यात्रेकरू वगळता) रद्द केले आहेत. सध्या एसव्हीईएस (SVES) व्हिसावर पाकिस्तानात (Pakistan) असलेल्या भारतीयांना ४८ तासांत देश सोडण्यास सांगितले आहे. तसेच, भारतीय उच्चायुक्तालयातील संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना ‘अवांछित व्यक्ती’ (persona non grata) घोषित करून ३० एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे निर्देश दिले आहेत. भारतीय उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्याही ३० पर्यंत कमी करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, पाकिस्तानने (Pakistan) आपल्या हवाई हद्दीत भारतीय मालकीच्या कोणत्याही विमानाला प्रवेशबंदी केली आहे आणि भारतासोबतचा सर्व प्रकारचा व्यापार तात्काळ थांबवला आहे. आपल्या राष्ट्रीय सार्वभौमत्वावर कोणताही हल्ला झाल्यास ‘फुल-स्पेक्ट्रम’ (full-spectrum) प्रतिसाद दिला जाईल, अशी धमकीही पाकिस्तानने (Pakistan) दिली आहे.

title : Pakistan’s 8 Retaliatory Steps Post-Pahalgam Fallout

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now