‘मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या… ‘; पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरची भारतावर टीका

On: May 7, 2025 3:10 PM
Hania Aamir
---Advertisement---

Hania Aamir | जम्मू काश्मीरमधील (Jammu Kashmir) पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) कारवाईचे देशभरातून कौतुक होत असताना, पाकिस्तानी (Pakistani) चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्रींनी मात्र यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी भारताच्या (India) या कृतीला ‘भ्याडपणा’ म्हटले असून, सोशल मीडियावर (Social Media) आपला संताप व्यक्त केला आहे.

भारताची कारवाई आणि कौतुक

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्यानंतर भारताने (India) पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक (Air Strike) करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. भारताच्या (India) या धडक कारवाईचे आणि भारतीय लष्कराचे (Indian Army) देशभरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

या कारवाईला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते. पहलगाम (Pahalgam) हल्ल्याचा बदला घेतल्याबद्दल अनेक भारतीयांनी समाधान व्यक्त केले आणि सोशल मीडियावर भारतीय लष्कराच्या शौर्याचे कौतुक केले. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत.

पाकिस्तानी अभिनेत्रींचा तीळपापड

भारताच्या (India) या कारवाईमुळे पाकिस्तानी (Pakistani) अभिनेत्री हानिया आमिरचा (Hania Aamir) चांगलाच तीळपापड झालेला दिसतो. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर (Instagram Story) एक पोस्ट शेअर करत भारताला (India) दोष दिला. हानियाने लिहिले की, “मी कोणत्याही पाकिस्तानी (Pakistani) माणसाला पहलगाम (Pahalgam) हल्ल्याचा जल्लोष करताना पाहिले नाही. परंतु असंख्य भारतीय या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या हत्येचा आनंद साजरा करत होते. माझ्याकडे कोणतेही शब्द नाहीत. माझ्याकडे फक्त राग, चीड आणि दुखावले गेलेले मन आहे. एक मुलगा जग सोडून गेला. त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. हे कशासाठी?”

हानिया आमिर पुढे लिहिते की, “तुम्ही या पद्धतीने कोणाची सुरक्षा करू शकत नाही. ही एक प्रकारची क्रूरता आहे. निष्पाप लोकांवर बॉम्बहल्ला करून तुम्ही याला स्ट्रॅटेजी म्हणू शकत नाही. ही ताकद नाही तर भ्याडपणा आहे. आम्ही तुम्हाला बघतोय.” हानिया आमिरनंतर (Hania Aamir) पाकिस्तानी (Pakistani) अभिनेत्री माहिरा खाननेही तिचा राग व्यक्त केला आहे. माहिरा म्हणाली की, “हा अत्यंत भ्याड हल्ला आहे. अल्लाह आमच्या देशाची सुरक्षा करेन. सद्बुद्धी येवो. आमीन.”

Title : Pak Actresses Slam India’s Air Strike

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now