‘पाकिस्तानात मुलींना उचलून नेतात, संध्याकाळी ५ नंतर तर…’; जळगावातील पाकिस्तानी नागरिकाने सांगितलं भयावह वास्तव

On: April 26, 2025 2:27 PM
Pakistani spy arrested
---Advertisement---

Jalgaon News | हल्ल्यानंतर भारताने (India) पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याच्या दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर, जळगाव (Jalgaon) येथे वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी निर्वासित कुटुंबांनी आपली व्यथा मांडली आहे. पाकिस्तानातील असुरक्षितता आणि अत्याचारांना कंटाळून भारतात आलो असून, परत जायचे नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानातील भयावह वास्तव

जळगावमध्ये (Jalgaon) दीर्घकालीन व्हिसावर (Long Term Visa) राहणाऱ्या अनेक पाकिस्तानी (Pakistani) कुटुंबांनी सांगितले की, पाकिस्तानात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. गॅस, पाणी, वीज या मूलभूत सुविधांची वानवा आहेच, पण त्याहून अधिक जीवघेणी भीती आहे. एका नागरिकाने सांगितले, “आम्ही तिकडे ५० वर्षे राहिलो, पण संध्याकाळी ५ नंतर दुकान बंद करून भीतीने घरात बसावे लागायचे.”

अनेक महिलांनी सांगितले की, पाकिस्तानात महिला आणि मुली अजिबात सुरक्षित नाहीत. “बाहेर पडणेही मुश्कील होते. मुली-बाळींना उचलून नेले जाते. अशा दहशतीखाली आम्ही जगत होतो,” असे त्यांनी म्हटले. याच अत्याचाराला कंटाळून त्यांनी भारत (India) गाठल्याचे स्पष्ट केले.

‘भारतात सुरक्षित, नागरिकत्व द्या’

“आम्ही गेल्या २ ते ४ वर्षांपासून जळगावात (Jalgaon) आहोत आणि इथे आम्हाला सुरक्षित वाटते, आनंद मिळतो,” अशी भावना या नागरिकांनी व्यक्त केली. त्यांनी भारत सरकारकडे (Government of India) कायमस्वरूपी नागरिकत्व देण्याची मागणी केली असून, त्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही सुरू आहे. आम्हाला आता पुन्हा त्या नरकात (पाकिस्तान) जायचे नाही, असे ते म्हणाले.

पाकिस्तानात  अडकलेल्या आपल्या नातेवाईकांनाही भारतात (India) आणण्याची परवानगी मिळावी, अशी त्यांची विनंती आहे. काही दिवसांपूर्वी ‘नूरी व्हिसा’वर (Noori Visa) पाकिस्तानात  गेलेले त्यांचे कुटुंबीय पहलगाम (Pahalgam) घटनेनंतर तिथेच अडकले असून, त्यांना परत भारतात (India) येऊ द्यावे, अशी आर्त मागणीही या बांधवांनी केली आहे.

Title : Pak Refugees in Jalgaon Recount Fear, Seek Indian Citizenship

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now