पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या भारताला पोकळ धमक्या, म्हणाले…

On: May 7, 2025 7:23 PM
Pakistan
---Advertisement---

Operation Sindoor | पहलगाम (Pahalgam) हल्ल्यानंतर भारताने (India) केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) कारवाईने पाकिस्तानचा (Pakistan) चांगलाच जळफळाट झाला आहे. पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी भारताने हल्ला नाही, तर आमची ‘मजाक’ उडवली आहे, असे म्हणत तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावून प्रत्युत्तराचा इशारा दिला असला तरी, त्यात पोकळ धमकीचाच सूर अधिक होता.

शरीफ यांचा संताप

भारताने पाकव्याप्त काश्मीर (PoK) आणि पाकिस्तानमधील (Pakistan) ९ दहशतवादी तळांवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर (Air Strike) पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली. पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने एक उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावण्यात आली. या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि लष्करप्रमुख उपस्थित होते, ज्यात भारताच्या कारवाईवर चर्चा झाली.

यानंतर संसदेत बोलताना पंतप्रधान शरीफ (Sharif) यांचा संताप अनावर झाला. ते म्हणाले, “भारताने फक्त आमच्यावर हल्ला केला नाहीये, तर आमची मजाक उडवली आहे. ८० विमानांच्या मदतीने हा हल्ला झाला, तो आम्ही कायम लक्षात ठेवू.” त्यांनी पुन्हा एकदा पहलगाम (Pahalgam) हल्ल्याशी पाकिस्तानचा (Pakistan) संबंध नसल्याचा दावा केला. “मी जगाला सांगितले होते की आमचा काही संबंध नाही, पण भारताने ऐकले नाही आणि एअर स्ट्राईक केला,” असे शरीफ (Sharif) म्हणाले.

पाकिस्तानचे दावे आणि उलट्या बोंबा

भारताच्या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त असताना, पाकिस्तानने (Pakistan) मात्र भारताने त्यांच्या धरणांवरही बॉम्ब फेकल्याचा अजब दावा केला आहे. भारतीय सैनिकांनी नीलम (Neelum) आणि नौसेरी धरणांवर बॉम्ब टाकल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे पाकिस्तानचे (Pakistan) म्हणणे आहे.

यापूर्वी पाकिस्तानच्या (Pakistan) लष्करी प्रवक्त्याने भारताने ९ ऐवजी फक्त ६ ठिकाणी हल्ला केल्याचा आणि भारताची ५ लढाऊ विमाने पाडल्याचा दावा केला होता. तसेच, हल्ल्यात २६ पाकिस्तानी (Pakistani) नागरिक मारले गेल्याचेही म्हटले होते, जे भारताच्या ‘फक्त दहशतवादी तळ आणि शून्य नागरिक मृत्यू’ या भूमिकेच्या विरोधात आहे. आता धरणांवर बॉम्ब टाकल्याचा दावा करून पाकिस्तान (Pakistan) सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

Title  : Pak PM Angry Over Operation Sindoor Sindoor, Claims Mockery

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now