Pak-Afghan Conflict । पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरु झालेल्या संघार्षाविषयी तुम्ही ऐकलंच असेल. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर ९ ऑक्टोबर २०२५ ला एअर स्ट्राईक केली आणि त्यानंतर अफगाणिस्तानने देखील पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांच्यातला हा वाद टोकाला गेला आहे. तालिबान्यांनी पाकिस्तानच्या लष्करी चौकीवर हल्ला केला आणि ताबाही घेतला आहे. या संघर्षात ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यानंतर पाक सैन्याची झोप उडाली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सीमेवरील स्थिती अतिशय तणाव पूर्ण आहे. (Pak-Afghan Conflict)
नेमके व्हिडीओमध्ये काय आहे? :
पाक-अफगाण सीमेवर अजूनही परिस्थिती गंभीर आहे. अजूनही दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. आधी पाकने केलेल्या हल्ल्यात अफगाणच्या सैन्याचे मोठे नुकसान झाले आणि आता अफगाणिस्तानने प्रतिउत्तर म्हणून केलेल्या हल्ल्यात देखील पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यांचे ५८ सैनिक ठार झाले असून त्यांची दाणादाण उडाल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे. कदाचित पाक सैन्याला हा हल्ला अपेक्षित नव्हता. पाकिस्तानी चौकीवर झालेल्या या हमल्यानंतर असीम मुनीर च्या सैन्याची खूप पळापळ झालेली व्हिडीओ मध्ये दिसून येते.
समोर आलेल्या माहितीनुसार तालिबानी दहशतवादी पाक सीमेच्या आत घुसले आणि त्यांनी लष्करी चौकीवर हल्ला करून फक्त ५८ सैनिक ठारच केले नाहीत तर ५ पाकिस्तानी सैनिक जिवंतही पकडले आहेत. या दरम्यान पाक सैनिकांची पळापळ झालेली दिसून येत आहे. तसेच अफगाण सैनिक पाकिस्तान सैन्याकडून शस्त्र हिसकावून घेताना दिसत आहे. अफगाण सरकारने या घटनेचा दावा केला आहे. पण पाकिस्तान सरकार आणि लष्कराने नेहमीप्रमाणे हे दावे फेटाळून लावले आहेत. (Pak-Afghan Conflict)
Pak-Afghan Conflict | काय आहे तणावाचे कारण :
पाकिस्तानचा असा आरोप आहे की अफगाणिस्तान तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सारख्या दहशत वादी संघटनांना आश्रय देते. या कारणावरून आधीपासूनच त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता. परंतु अफगाण सरकारने हे आरोप वेळोवेळी फेटाळले आहेत. चालू असणाऱ्या या संघर्षादरम्यान अफगाणचे परराष्ट्र मंत्री मुक्ताकी भारत दौऱ्यावर आहेत. यामुळे पाकिस्तानने संतापून अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले आणि अफगाणने त्याचे प्रतिउत्तरही दिले. आता या सगळ्याचा दोन्ही देशांवर काय परिणाम होईल? भारतावर याचा काय परिणाम होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.






