Pahalgam | पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले गुजरातच्या (Gujarat) सुरत (Surat) जवळील काथोर (Kathor) गावचे शैलेशभाई कडथिया (Shaileshbhai Kadathiya) यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. वडिलांना मुखाग्नी दिल्यानंतर त्यांच्या मुलाने हल्ल्याचा प्रत्यक्ष अनुभव कथन केला, ज्यात दहशतवाद्यांनी धर्माच्या आधारावर लोकांना वेगळे करून गोळीबार केल्याचे त्याने सांगितले.
धर्माच्या आधारावर वेचून मारले
शैलेशभाईंचे (Shaileshbhai Kadathiya) पार्थिव बुधवारी रात्री उशिरा सुरतला आणण्यात आले आणि गुरुवारी सकाळी काथोर गावात अंत्यसंस्कार पार पडले. त्यानंतर त्यांच्या मुलाने सांगितले, “काश्मीर (Kashmir) खूप सुंदर आहे. आम्ही पहलगामला घोड्यावरून फिरायला गेलो. पण १०-१५ मिनिटांतच दहशतवादी आले. आम्ही पळून लपलो, पण त्यांनी आम्हाला शोधून काढले.”
“आम्ही दोन दहशतवादी पाहिले,” असे सांगून तो पुढे म्हणाला, “त्यांनी सर्व पुरुषांना ‘मुस्लिम वेगळे व्हा, हिंदू वेगळे व्हा’ असे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी हिंदू पुरुषांना गोळ्या घातल्या आणि निघून गेले.” या हल्ल्याच्या वेळी २० ते ३० जण तिथे होते आणि दहशतवादी अगदी जवळून बोलत होते, असेही त्याने नमूद केले.
‘कलमा-कलमा’ ओरडत होते, पुन्हा काश्मीरला जाणार नाही
मुलाने सांगितले की, दहशतवादी ‘कलमा-कलमा’ असे ओरडत होते आणि त्यांनी तीन वेळा ‘कलमा’ व ‘मुस्लिम’ असे शब्द उच्चारले. “मुस्लिमांना त्यांची भाषा कळत होती. पण जे हिंदू होते, त्यांना गोळ्या मारल्या गेल्या,” असे तो म्हणाला. जीव वाचवण्यासाठी पळापळ सुरू झाल्यावर आई आणि बहिणीने त्याला घोड्यावर बसवले, तर त्या स्वतः पायी खाली आल्या. “आम्ही वाचू असे वाटले नव्हते, पण वाचलो. आईला वडिलांना सोडायचे नव्हते, पण आम्हाला जावे लागले,” असे सांगताना त्याने देवाचे आभार मानले.
एवढा मोठा हल्ला होऊनही खाली असलेल्या लष्कराच्या तळाला काहीच माहिती नव्हती, यावर त्याने आश्चर्य व्यक्त केले. पहलगाममध्ये (Pahalgam) सुरक्षा व्यवस्था तैनात असायला हवी होती, असे मत त्याने मांडले. या अनुभवानंतर आपण पुन्हा कधीही काश्मीरला (Kashmir) जाणार नाही, असे त्याने स्पष्ट केले.
Title : Pahalgam: Victim’s Son Recounts Religious Segregation Killing






