विनय-हिमांशीचा हल्ल्यापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल, अख्ख्या भारताचे डोळे पाणावले

On: April 24, 2025 7:00 PM
---Advertisement---

Pahalgam  | पहलगाम हल्ल्यात शहीद झालेले नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल (Vinay Narwal) आणि त्यांची पत्नी हिमांशी (Himanshi Narwal) यांचा हल्ल्यापूर्वीचा एक भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लग्नानंतर आठवड्याभरातच हनिमूनसाठी काश्मीरला (Kashmir) गेलेल्या या जोडप्याचा हा शेवटचा आनंदी क्षण ठरला. यात विनय शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पोझमध्ये दिसत आहेत.

बैसरन व्हॅलीतील शेवटचा रोमँटिक क्षण

पाकिस्तानी (Pakistani) दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ भारतीयांना प्राण गमवावे लागले, ज्यात लेफ्टनंट विनय नरवाल (Vinay Narwal) यांचाही समावेश होता. या हल्ल्याच्या काही क्षण आधी, विनय आणि हिमांशी (Himanshi Narwal) बैसरन व्हॅलीच्या (Baisaran Valley) निसर्गरम्य वातावरणात आनंदी क्षण घालवत होते. त्यांनी ‘मेरी ख्वाहिश तू, मेरी हसरत तू…’ या गाण्यावर आधारित एक फिल्मी पद्धतीने व्हिडिओ चित्रित केला होता.

या व्हिडिओमध्ये लेफ्टनंट विनय हे बॉलीवूड (Bollywood) अभिनेते शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांची प्रसिद्ध सिग्नेचर पोझ देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आता (Pahalgam Attack) हल्ल्यापूर्वीचा त्यांचा शेवटचा एकत्र, आनंदी क्षण म्हणून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, जो पाहून अनेकांना गहिवरून येत आहे.

व्हिसा मिळाला नाही, वाढदिवसही राहिला अधुरा

बुधवारी दिल्ली (Delhi) विमानतळावर भारतीय नौदलाने (Indian Navy) लेफ्टनंट विनय यांच्या पार्थिवाला मानवंदना दिली, जिथे हिमांशीनेही (Himanshi Narwal) अश्रूंना वाट मोकळी करत पतीला अखेरची सलामी दिली. नंतर त्यांच्या बहीण आणि वडिलांनी मुखाग्नी दिला. लग्नानंतर या जोडप्याने हनिमूनसाठी युरोपला (Europe) जाण्याची योजना आखली होती, मात्र ऐनवेळी व्हिसा न मिळाल्याने त्यांनी काश्मीरला जाण्याचा निर्णय घेतला.

२१ एप्रिल रोजी ते जम्मू आणि काश्मीरला (Jammu and Kashmir) पोहोचले आणि २२ एप्रिलला पहलगाममधील  हॉटेलमध्ये थांबले. जेवणानंतर ते बैसरन खोऱ्यात (Baisaran Valley) फिरायला गेले असता हा हल्ला झाला. अवघ्या ८ दिवसांनी, १ मे रोजी विनय यांचा वाढदिवस होता, ज्यासाठी कुटुंबाने पार्टीची योजना केली होती. २ मे रोजी ते पत्नीसह कोची (Kochi) येथे ड्युटीवर परतणार होते, पण त्यापूर्वीच काळाने घाला घातला.

Title : Pahalgam Victim Lt Narwal’s Last Viral Video

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now