प्रतिभा पवारांना अडवलं, सोशल मीडियावर अजित पवारांविरोधात संताप

On: November 17, 2024 5:23 PM
Ajit Pawar Target Pratibha Pawar
---Advertisement---

Baramati | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यास गेटवर थांबवण्यात आलं. प्रतिभा पवार यांच्यासोबत त्यांच्या नात रेवती सुळे या देखील होत्या. दोन्ही जण टेक्स्टाईल पार्क येथे खरेदीसाठी गेले होते. पण टेक्स्टाईल पार्कच्या गेटवरच प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना रोखण्यात आलं.

जवळपास अर्ध्या तास थांबल्यानंतर त्यांना आतमध्ये सोडण्यात आलं. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्या ऑफिसकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे.

या घटनेचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर सोशल मिडियावरती अजित पवारांवर संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेटवर अडवल्यानंतर सोशल मिडियावरती व्हिडिओ शेअर करून अजित पवारांवर हल्लाबोल केला जात आहे.

जे कुटुंबाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार? उद्या मतदान दिले नाही तर बारामतीकराना पाणी, वीज सगळ बंद करणार का?, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

बारामती टेक्स्टाईल पार्कचे सीईओ अनिल पवार यांनी गेटवरुन एकही गाडी आतमध्ये सोडू नये, असा आदेश दिल्याची चर्चा आहे. पण सुरक्षा रक्षकाला टेक्स्टाईल पार्क सुरु आहे का? असा प्रश्न विचारला असता, सुरक्षा रक्षक सुरु असल्याचं म्हणतो. पण आपल्याला एकही गाडी आत सोडायला सांगितलेली नाही, असंही तो सुरक्षा रक्षक म्हणतो. त्यामुळे प्रतिभा पवार यांना टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यास का रोखण्यात आलं? याबाबत टेक्स्टाईल पार्कचे सीईओ अनिल पवार यांच्याकडून काय स्पष्टीकरण येतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“हनीमूनच्या रात्री, माझ्या शरीराचा…”, करिश्मा कपूरच्या गौप्यस्फोटाने बाॅलिवूड हादरलं!

चंद्रकांत पाटलांकडून सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रयत्न, विविध उपक्रमांना दिलं पाठबळ

विकासाचा वारसा जोपासणाऱ्या निलंगेकरांच्या पाठीशी ताकद उभी करा- बसवराज पाटील मुरूमकर

“संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वातच निलंग्याचा विकास झाला”

‘लग्नापूर्वी हा अभिनेता करिश्माचा पहिला…’; करीना कपूरकडून सर्वात मोठा खुलासा

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now