भारतीय सैन्याकडून पाकिस्तानला आणखी एक झटका!

On: May 8, 2025 4:31 PM
---Advertisement---

Operation Sindoor | पहलगाममध्ये (Pahalgam) झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत सुमारे १०० दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. या यशस्वी सर्जिकल स्ट्राईकनंतर (surgical strike) भारतीय लष्कराने पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. पाकिस्तानच्या दाव्यानुसार, या सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील महत्त्वाचे जलसाठे नष्ट केले आहेत.

मिळालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानमधील ९ ठिकाणी केलेल्या अचूक हवाई हल्ल्यांनंतर भारतीय लष्कराने नीलम नदीवरील (Neelam River) नीलम-झेलम धरणावर (Neelum–Jhelum Hydropower Plant) बॉम्ब टाकले. या शक्तिशाली बॉम्बस्फोटामुळे धरणाचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तान या धरणाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज निर्माण करतो. नीलम व्हॅली (Neelam Valley) भारतीय सीमेपासून केवळ ३ किलोमीटर अंतरावर असून, हा भाग पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) येतो. पहलगाम हल्ल्यानंतर नीलम व्हॅली परिसर सर्वाधिक प्रभावित झाला होता.

पाकिस्तानचे म्हणणे काय आहे?

पाकिस्तानी सैन्याचे म्हणणे आहे की, सर्जिकल स्ट्राईकनंतर रात्री २ वाजता नौसेरी धरणावर (Nauseri dam) बॉम्ब टाकण्यात आला, ज्यामुळे धरणाचे मोठे नुकसान झाले आहे. पाकिस्तानने या कारवाईला आंतरराष्ट्रीय कायद्यांचे (international laws) उल्लंघन म्हटले आहे. तथापि, भारताने अद्याप या आरोपांवर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा

भारताने ही कारवाई केवळ दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरच केली आहे. भारताने केलेल्या या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात भारताने जैश-ए-मोहम्मदचे (Jaish-e-Mohammed) ४, लष्कर-ए-तोयबाचे (Lashkar-e-Taiba) ३ आणि हिजबुल मुजाहिदीनचे (Hizbul Mujahideen) २ तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत.

दरम्यान, भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, २०१६ मध्ये उरी (Uri) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आणि २०१९ मध्ये पुलवामा (Pulwama) येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतरही भारताने यशस्वी सर्जिकल स्ट्राईक केले होते. उरी येथील सर्जिकल स्ट्राईकमध्ये सुमारे २५० दहशतवादी मारले गेले होते, तर बालाकोट येथील सर्जिकल स्ट्राईकमध्ये ३०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

Title : Another Blow to Pakistan After Air Strikes; Indian Army Blows Up Neelum–Jhelum Dam

 

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now