ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं?, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिली संपूर्ण माहिती

On: May 7, 2025 12:07 PM
Vyomika Singh , sofiya-qureshi
---Advertisement---

Operation Sindoor | जम्मू काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारताने (India) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) द्वारे चोख प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण मोहिमेची सविस्तर माहिती लष्कर (Army) आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या (Ministry of External Affairs) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे, लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलातील विंग कमांडर व्योमिका सिंग (Wing Commander Vyomika Singh) या ‘नारी शक्ती’ने पुराव्यानिशी पाकिस्तानचा सहभाग उघड केला.

हल्ल्याचा उद्देश आणि पाकिस्तानचा संबंध

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री (Vikram Misri) यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, पहलगाम येथील हल्ला हा जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) वाढते पर्यटन, सुधारत असलेली अर्थव्यवस्था आणि विकास प्रक्रियेला खीळ घालण्याचा सुनियोजित प्रयत्न होता. या हल्ल्याचा मुख्य उद्देश राज्यात अस्थिरता निर्माण करून प्रगती रोखणे हा होता.

मिस्री (Misri) पुढे म्हणाले की, या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने (TRF – The Resistance Front) घेतली असून, ही संघटना लष्कर-ए-तैयबाशी (Lashkar-e-Taiba) संबंधित आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या तपासात हल्लेखोरांचे पाकिस्तानशी (Pakistan) थेट संबंध असल्याचे निःसंदिग्धपणे उघड झाले आहे. “पाकिस्तानला दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून जगभरात मान्यता मिळाली आहे,” असे ते म्हणाले. हल्ल्यानंतर पंधरा दिवस उलटूनही पाकिस्तानने कोणतीही कारवाई न करता उलट भारतावर (India) आरोप केले, त्यामुळे भारताला (India) दहशतवाद संपवण्यासाठी आणि भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी प्रत्युत्तर देणे भाग पडले.

‘ऑपरेशन सिंदूर’ची धडक कारवाई

लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sofia Qureshi) यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेची सविस्तर माहिती दिली. त्या म्हणाल्या, “२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू करण्यात आले होते. या अत्यंत विचारपूर्वक केलेल्या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) ९ दहशतवादी अड्डे लक्ष्य करून पूर्णपणे नष्ट करण्यात आले.” या कारवाईदरम्यान निष्पाप नागरिकांना कोणतीही इजा होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

कर्नल कुरेशी यांनी सांगितले की, मार्च २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu-Kashmir) चार जवानांची हत्या करणारे तसेच मुंबई (Mumbai) दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांच्या लपण्याच्या आणि प्रशिक्षणाच्या ठिकाणांनाही या ऑपरेशनमध्ये लक्ष्य करण्यात आले. जैश-ए-मोहम्मदचे (Jaish-e-Mohammed) मुख्यालय असलेले मरकज सुभानल्लाह (Markaz Subhanallah), जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते, ते उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच, कोटली अब्बासमधील (Kotli Abbas) दहशतवादी तळ, जिथे सुमारे १५०० दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते, आणि पाकिस्तानी पंजाबमधील (Pakistani Punjab) बहावलपूर (Bahawalpur) व महमूना झोया (Mahmuna Zoya) येथील दहशतवाद्यांचे अड्डेही नेस्तनाबूत करण्यात आले. लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय आणि दहशतवादी अजमल कसाबला (Ajmal Kasab) प्रशिक्षण मिळालेले मुरीदके (Muridke) येथील मरकज तैयबा (Markaz Tayyaba) देखील या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले. कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळाला लक्ष्य केले गेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणांचे आणि त्यांच्या नाशाचे छायाचित्रित पुरावेही सादर केले.

Title : Operation Sindoor Briefing: Women Officers Expose Pak

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now