घरबसल्या पॅन कार्ड कसं काढावं?; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत 

On: May 13, 2025 1:06 PM
Pan Card
---Advertisement---

PAN Card | पॅन कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी एक अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र आणि आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक दस्तऐवज मानले जाते. आयकर भरण्यासाठी ‘फॉर्म १६ए’, अनिवासी भारतीयांसाठी ‘फॉर्म ४९एए’, मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी, बँक खाते घडण्यासाठी, तसेच टीडीएस किंवा टीसीएस जमा करण्यासाठी पॅन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. आता पॅन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली असून, ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो.

ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत

नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या पॅन कार्डमध्ये बदल/दुरुस्ती  करण्यासाठी, अर्जदार अधिकृत वेबसाइट्सचा  वापर करू शकतात. यासाठी https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html किंवा https://www.utiitsl.com/ या संकेतस्थळांना भेट देता येते. या वेबसाइट्सवर ‘ऑनलाइन पॅन अर्ज’ किंवा ‘पॅन कार्डमधील बदल/दुरुस्ती’ या पर्यायांवर क्लिक करून अर्ज भरता येतो. अर्ज भरताना ‘फिजिकल मोड’ किंवा ‘डिजिटल मोड’ असे दोन पर्याय उपलब्ध असतात.

‘फिजिकल मोड’ (Physical Mode) निवडल्यास, अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटआऊट घेऊन, त्यावर आवश्यक कागदपत्रे जोडून, स्वाक्षरी करून, तो अर्ज आयकर विभागाच्या कार्यालयात टपालाने पाठवावा लागतो. तर, ‘डिजिटल मोड’ मध्ये, आधार कार्डशी संलग्न असलेल्या ई-केवायसी आणि ई-साईन द्वारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येते, ज्यामुळे कागदपत्रे प्रत्यक्ष पाठवण्याची गरज भासत नाही. अर्ज करताना, भारतीय नागरिकांनी ‘फॉर्म ४९ए’ (Form 49A) आणि अनिवासी भारतीयांनी ‘फॉर्म ४९एए’ निवडणे आवश्यक आहे. ‘फिजिकल मोड’ मध्ये अर्ज केल्यास, प्रिंटआऊटवर अर्जदाराने अलीकडील दोन फोटो चिकटवून त्यावर स्वाक्षरी करणे आणि अर्ज पाठवताना इतर कागदपत्रांच्या प्रती  जोडणे बंधनकारक असते.

अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, अर्जदाराला एक विशिष्ट कालावधीत पॅन कार्ड घरपोच मिळते. ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही चूक झाल्यास, ती काळजीपूर्वक दुरुस्त करण्याची गरज असते. यासाठी, वेबसाइटवरील व्हिडिओ किंवा मार्गदर्शक तत्त्वांची मदत घेता येते.

अर्ज आवश्यक कागदपत्रांसह पुढे पाठवण्यापूर्वी सर्व माहिती पुन्हा एकदा तपासून घ्यावी. पॅन कार्ड अर्ज भरताना ‘कॅपिटल लेटर’ मध्ये माहिती भरणे, नवीन पॅन कार्ड नसल्यास ‘नाही’ असे नमूद करणे यासारख्या लहान पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे अर्ज बाद होण्याची शक्यता कमी होते.

Title : Online PAN Card Application Process Simplified

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now