कांद्याचे भाव कडाडले! महागड्या कांद्यापासून दिलासा मिळणार का?

On: September 6, 2024 11:39 AM
Onion Price
---Advertisement---

Onion Prices l टोमॅटोचे दर घसरल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. किरकोळ बाजारात कांदा 60 ते 70 रुपये किलो दराने विकला जात आहे. कांद्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार दिल्ली-एनसीआरमध्ये स्वस्त दरात कांदा विकणार आहे. कांद्याची ही विक्री मोबाईल व्हॅन आणि NCCF च्या किरकोळ दुकानातून 35 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने केली जाईल.

कांद्याचा दर 60 रुपये किलोच्यावर पोहोचला :

अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी कृषी भवन येथून कांद्याची किरकोळ विक्री सुरू करणार असल्याचे सरकारी निवेदनात सांगण्यात आले. त्यात म्हटले आहे की कृषी भवन, एनसीयूआय कॉम्प्लेक्स, राजीव चौक मेट्रो स्टेशन, पटेल चौक मेट्रो स्टेशन आणि नोएडाच्या काही भागांसह 38 ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे विक्री केली जाईल. बाजारपेठेत स्वस्त कांदा विकण्याचा उद्देश स्थानिक पुरवठा सुधारणे आणि स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या या प्रमुख खाद्यपदार्थाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे हा आहे.

राजधानी दिल्ली आणि परिसरात कांदा 60 रुपये किलोपेक्षा जास्त दराने विकला जात आहे. NCCF ने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केलेल्या कांद्याचा बफर स्टॉक ठेवला आहे. ग्राहकांना वाढत्या किमतींपासून वाचवण्यासाठी आणि मध्यस्थांना होणाऱ्या नफ्यापासून वाचवण्यासाठी, तोच कांदा किरकोळ विक्रीतून 35 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विकला जाईल.

Onion Prices l कांद्याचे भाव का वाढत आहेत? :

एनसीसीएफने सांगितले की, शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधून आणि सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध करून ग्राहकांवर होणाऱ्या किमतीतील चढ-उताराचा परिणाम कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

कांद्याचे भाव वाढण्याचे कारण म्हणजे अनेक गोष्टींशी निगडीत आहे. कांदा पिकाला पावसाचा फटका बसला तर पिकाचे नुकसान होऊन उत्पादनात घट होऊन भाव वाढतात. दुसरे म्हणजे, कमी पाऊस किंवा दुष्काळामुळे कांद्याच्या उत्पादनावरही परिणाम होतो आणि त्याचा परिणाम भावावर दिसून येतो. याशिवाय साठवणूक कमी झाली तर बाजारात नवीन पीक येण्यापूर्वीच भावात वाढ दिसून येते. बाजारात कांद्याचा पुरवठा कमी असल्याने मागणी आणि पुरवठ्याच्या नियमानुसार भाव वाढतात.

News Title – Onion Prices Hike

महत्त्वाच्या बातम्या-

रवींद्र जडेजाची दुसऱ्या इनिंगला सुरुवात! ‘या’ राजकीय पक्षात एन्ट्री

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच आनंदवार्ता, सोन्याचे दर घरसले; काय आहे सध्या भाव?

राज्यात 29 हजार नोकऱ्या उपलब्ध होणार, महाराष्ट्रात 4 मोठ्या प्रकल्पांना मान्यता

आज हरितालिकेचा व्रत, जाणून घ्या पूजेची योग्य वेळ आणि शुभ मुहूर्त

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now