कांद्यावर काळे डाग असतील तर काळजी घ्या, अन्यथा होतील ‘हे’ गंभीर आजार

On: November 1, 2025 7:26 PM
Black Spots Onion
---Advertisement---

Black Spots Onion | अनेकांना जेवणासोबत कच्चा कांदा खाण्याची सवय असते, जो पचनासाठी चांगला मानला जातो. पण अनेकदा आपण कांदा नीट तपासून पाहत नाही. जर कांद्यावर काही विशिष्ट प्रकारचे डाग असतील तर तो फायद्याऐवजी आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे कांदा खाण्यापूर्वी आणि साठवण्यापूर्वी योग्य माहिती असणे आवश्यक आहे. (Black Spots Onion)

कांद्यावरील काळे डाग म्हणजे काय?

अनेकजण एकाच वेळी ५ ते १० किलो कांदे खरेदी करतात. पण कांदा कापत असताना त्यावर काळे डाग दिसल्यास सावधगिरी बाळगावी. हे काळे डाग म्हणजे ‘अ‍ॅस्परगिलस नायजर’ (Aspergillus niger) नावाची एक बुरशी असते. ही बुरशी मातीत आढळते आणि मातीतून ती कांद्यामध्ये सहज प्रवेश करू शकते.

जर हे डाग फक्त कांद्याच्या बाहेरील सालीवर असतील, तर ती साल पूर्णपणे काढून, कांदा स्वच्छ धुऊन वापरता येतो. मात्र, जर हे काळे डाग कांद्याच्या आतील थरांपर्यंत पोहोचले असतील, तर असा कांदा खाणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. ही बुरशी शरीरात गेल्यास ॲलर्जीक प्रतिक्रिया (Allergic Reactions) होऊ शकतात.

Black Spots Onion | कोणी टाळावे आणि साठवणूक कशी करावी?

ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, विशेषतः दमा (Asthma), क्षयरोग (TB) किंवा एचआयव्ही (HIV) असलेले रुग्ण, तसेच मधुमेही रुग्ण, यांनी असे बुरशी लागलेले कांदे खाणे पूर्णपणे टाळावे. या बुरशीचे कण श्वासावाटे फुफ्फुसात जाऊन संसर्ग निर्माण करू शकतात आणि दम्याच्या रुग्णांना यामुळे झटकाही येऊ शकतो.

कांद्यावर काळे डाग असण्याव्यतिरिक्त, जर कांदा मऊ झाला असेल किंवा त्याला विचित्र वास येत असेल, तरी तो खाऊ नये. कांदा साठवण्याची योग्य पद्धतही महत्त्वाची आहे. कांदे कधीही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू नयेत. तसेच, चिरलेला कांदा फ्रिजमध्ये उघडा ठेवू नये आणि बटाट्यांसोबत कांदे ठेवण्याची चूक करू नये, कारण यामुळे कांदे लवकर खराब होतात.

News Title – Onion Black Spots, Health Warning

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now