संसदेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला ‘इतकी’ मते विरोधात पडली!

On: December 17, 2024 3:38 PM
Election Date 2026
---Advertisement---

one nation one election l आज लोकसभेच्या संसदेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडण्यात आले. यावेळी कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी घटनेतील 129 संशोधन विधेयक 2024′ संसदेत मांडले. या विधेयकावर EVM ने मतदान देखील घेण्यात आले. मात्र यावेळी एकूण 369 सदस्यांनी मतदान केले. परंतु, यावेळी या विधेयकाच्या बाजूने 220 आणि विरोधात 149 मते पडली आहेत. यानंतर विरोधी सदस्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला आहे.

EVM च्या प्रक्रियेवर विरोधकांनी आक्षेप घेतला :

याशिवाय EVM च्या या प्रक्रियेवर देखील विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. तसेच त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचे सांगितले. परंतु, यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, आम्ही आधीच सांगितले होते की, जर एखाद्या सदस्याला तसे वाटत असेल तर तो मतपत्रिकेद्वारे त्याचे मत देखील देऊ शकतो. मात्र त्यानंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इलेक्रॉनिक मतदानाची प्रक्रिया सर्वाना सांगितली. त्यांनी म्हटले, तुम्ही ज्यावेळी मतदान करतात तेव्हा चूकन बटन दाबले गेले असेल तर मतपत्रिकेद्वारे तुम्ही ती चूक दुरुस्त करु शकतात. परंतु लोकसभेचे सेक्रेटरी जनरल तुमची पूर्ण व्यवस्था करेल. कारण अनेक खासदार लोकसभा संसदेत नवीन आहेत. त्यामुळे ते पहिल्यांदाच संसदेत आले आहेत.

one nation one election l कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक लोकसभेत मांडले :

मात्र मतपत्रिकेवर मतदान झाल्यानंतर लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निकाल देखील सांगितला आहे. त्यांनी सांगितले की, प्रस्तावाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मते पडली आहेत. त्यानंतर कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक लोकसभेत मांडले. मात्र त्यानंतर लोकसभेची कारवाई ही दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली होती.

News Title : One Nation One Election Bill E voting on parliament

महत्वाच्या बातम्या –

मी लहान खेळणं वाटतो का? भुजबळांनी मनातली सगळीचं खदखद बाहेर काढली

सरपंचाच्या निर्घृण हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण!

“माझं मंत्रिपद कोणी नाकारलं”, छगन भुजबळ कडाडले

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

‘…तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now