‘नोकरी टिकवायची असेल तर मला…’; ऑफिसमधल्या महिलेसोबत नक्की काय घडलं?

On: December 21, 2024 1:36 PM
Crime
---Advertisement---

Crime News | बिहारच्या किशनगंज जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये एक महिला कर्मचारीने तिच्या साथी कर्मचारी विरुद्ध यौन शोषणाचा गंभीर आरोप लावला आहे. ही घटना जीविका संस्थानशी संबंधित आहे, जिथे पीडित महिला कार्यरत होती. पीडित महिलेने केलेल्या खुलाशामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

काय घडलं नेमकं?

समोर आलेल्या माहितीनूसार पीडित महिलेने तिच्या बाॅसवर (office boss)  आरोप केला आहे. समीरकुमार बैठा असं आरोपीचं नाव असून गेल्या साढे चार वर्षांपासून तो सतत यौन शोषण करत होता असा आऱोप करत महिलेने मोठा खुलासा केला.

एवढंच नाही तर, त्याने महिलेला नोकरी टिकावयची असेल तर त्याला खुश ठेवण्यास सांगितलं होतं. या आरोपानुसार, समीर कुमार बैठाने महिलेला फसवून त्याच्या भाड्याच्या घरात नेलं आणि तिच्यावर जबरदस्ती केल्याची माहिती आहे.

महिलेची ओळख कुठे झाली?

पीडित महिला युवती जीविका संस्थेमध्ये नोकरी करत होती. ढेकसारा येथे महिलेची समीर कुमार (office boss) बैठासोबत ओळख झाली. तर, समीर कुमार जीविका संस्थेत बुक-कीपरच्या पदावर कार्यरत आहे. तो छोट्या-छोट्या चूका काढायचा. नोकरी टिकवायची असल्याने मी त्याचं ऐकायची. त्याची वाईट नजर असल्याचा आरोप देखील महिलेने केला आहे. बिहारच्या किशनगंजमधलं हे प्रकरण आहे.

तर हे प्रकरण एवढ्यावर न थांबता समीरने गर्भ पाडण्याचं औषध दिल्याचं या महिलेकडून सांगण्यात आलं आहे. तक्रारीनुसार, पीडित युवती काही दिवसांनी गर्भवती राहिली होती. त्यावेळी त्याने गर्भ पाडण्याचं औषध दिलं.

लोकलाजेस्तव मी माझ्या कुटुंबीयांनाही याबद्दल काही बोलली नाही. अखेर एक दिवस या त्रासाला कंटाळून ती महिला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि घडलेला प्रकार सांगितला.

News title : office boss to exploit female employee

महत्त्वाच्या बातम्या-

संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडेंना भोवणार?

बाईकवर आले, हातात 10 मोबाईल; संजय राऊतांच्या घराबाहेर काय घडलं?

सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री ॲक्शनमोडमध्ये; सर्वात मोठा निर्णय घेतला

महायुतीकडून ‘या’ लाडक्या बहिणींना मिळाला धोका?

“वाल्मिक कराडला सोडणार नाही”; सरपंच हत्याप्रकरणी फडणवीस आक्रमक

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now