नवरात्रीत चार खास राजयोग, ‘या’ 3 राशींना देवी करणार धनवान!

On: October 3, 2024 10:18 AM
October Rajyog 2024
---Advertisement---

October Rajyog 2024 | पंचांगा नुसार या ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रह राशी बदल करणार आहेत. आज 3 ऑक्टोबरपासून नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली आहे. या नवरात्रोत्सवाच्या महिन्यात चार राजयोग तयार होत आहेत, ज्यामध्ये कर्म दाता शनिदेव शश राजयोग निर्माण करत आहे. त्याचबरोबर व्यवसायाचा दाता बुध भद्रा राजयोग निर्माण करत आहे. (October Rajyog 2024)

यासोबतच धन आणि समृद्धी दाता सूर्य देव तूळ राशीत प्रवेश करत असल्याने मालव्य राजयोग तयार होत आहे. तसेच या महिन्यात बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण राजयोग देखील तयार होत आहे. या राजयोगाचा 3 राशीच्या व्यक्तींना खूप फायदा होणार आहे. आता या तीन राशी नेमक्या कोणत्या आहेत, ते पाहुयात.

‘या’ 3 राशी होणार धनवान

वृषभ रास : ऑक्टोबर महिना वृषभ राशीसाठी खूप शुभ ठरणार आहे. या महिन्यात निर्माण होणाऱ्या चार राजयोगामुळे तुम्हाला काम आणि व्यवसायात भरपूर प्रगती मिळेल. तसेच या महिन्यात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमच्या उत्पन्नाचे स्त्रोतही वाढू शकतात. तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते. तुमचे वैवाहिक जीवन अजून सुखी होईल. (October Rajyog 2024)

सिंह रास : या राशीसाठी ऑक्टोबर महिना शुभ असणार आहे. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन आणि उत्कृष्ट संधी मिळतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. या महिन्यात तुमचा जोडीदाराचा शोध देखील पूर्ण होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण झाल्याने घर खरेदीचा देखील विचार कराल.

तूळ रास : या राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबर महिना अत्यंत फलदायी ठरणार आहे. तसेच शनिदेवाचाही तुमच्या राशीवर प्रभाव होईल, त्यामुळे चार राजयोग तयार झाल्याने तुमचे दैनंदिन उत्पन्न वाढेल. तुमची लव्ह लाईफ देखील या काळात चांगली राहील. तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसह प्रेमविवाह करू शकता.तुमचा विवाहयोग जुळून येईल. (October Rajyog 2024)

News Title – October Rajyog 2024

महत्त्वाच्या बातम्या-

नवरात्रीत सोन्याने दाखवला दरवाढीचा रंग, जाणून घ्या 10 ग्रॅमचे दर

विधानसभेपूर्वीच महायुतीत वादाची ठिणगी?, शिंदे गटाच्या मंत्र्याचा थेट भाजपला इशारा

आजपासून नवरात्रीला सुरुवात, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त व पूजेची पद्धत

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी

तृप्ती डिमरीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संतापले

Join WhatsApp Group

Join Now