Obesity Health Risks l जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या नव्या संशोधनात एक धक्कादायक आणि जनजागृती करणारा खुलासा झाला आहे. लठ्ठपणामुळे तब्बल १६ गंभीर आजारांचा धोका वाढतो, असं या संशोधनातून निष्पन्न झालं आहे. अमेरिकेतील २.७ लाख लोकांच्या आरोग्यविषयक आकडेवारीचा अभ्यास करून ही माहिती मिळाली आहे.
विशेष म्हणजे लठ्ठपणाचं प्रमाण जसजसं वाढत गेलं, तसतसे या सर्व आजारांचं प्रमाणही वाढत गेलं. BMI (बॉडी मास इंडेक्स) 35 पेक्षा जास्त असणं हे ‘गंभीर लठ्ठपणा’ मानलं जातं आणि यामुळे शरीरातील अनेक अवयवांवर ताण येतो.
कोणते आहेत ते १६ आजार? :
उच्च रक्तदाब
टाइप 2 मधुमेह
उच्च कोलेस्ट्रॉल (डिस्लिपिडेमिया)
हृदयविकाराचा झटका
अनियमित हृदयाचे ठोके
हृदयाशी संबंधित आजार (एथेरोस्क्लेरोटिक डिसीज)
दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
फुफ्फुसातील रक्त गोठणे (Pulmonary embolism)
शरीरातील नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या (DVT)
संधिवात (Gout)
फॅटी लिव्हर
पित्ताशयातील खडे
स्लीप अप्निया
दमा (Asthma)
ॲसिडिटी व छातीत जळजळ (GERD)
हाडे आणि सांध्यांचे आजार (ऑस्टियोआर्थरायटिस)
त्यापैकी स्लीप अप्निया, टाइप 2 मधुमेह, आणि फॅटी लिव्हर यांचा लठ्ठपणाशी अधिक स्पष्ट संबंध दिसून आला आहे.
Obesity Health Risks l काय कराल आता? सावधगिरी हाच उपाय! :
या अभ्यासातून हे स्पष्ट होतं की, लठ्ठपणा ही केवळ एक शारीरिक स्थिती नसून अनेक आजारांना निमंत्रण देणारी गंभीर आरोग्य समस्या आहे. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणं, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि तणावमुक्त जीवनशैली ही लठ्ठपणावरची प्रभावी उत्तरं आहेत. तसेच लठ्ठपणा टाळल्यास केवळ आजार नाही, तर दैनंदिन जीवनातील अनेक अडथळेही कमी करता येतात.






